चिनी स्मार्टफोन कंपनी विवो सध्या बजेट सेगमेंटमध्ये जास्त सक्रिय झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने स्वस्त Vivo Y15s (2021) स्मार्टफोन सिंगापूरमध्ये सादर केला होता. तर आता फिलीपीन्समध्ये किफायतशीर Vivo Y15A लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Helio P35 चिपसेट आणि 5000mAh च्या बॅटरीसह सादर केला आहे.
Vivo Y15A चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y15A मध्ये 6.51 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो वॉटरड्रॉप नॉचसह सादर करण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी या डिवाइसमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. यात ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS, microSD, microUSB स्लॉट आणि साइड माउंट फिंगरप्रिंट सेन्सरसह 3.5mm ऑडियो जॅक देण्यात आला आहे. तसेच पॉवर बॅकअपसाठी यात 10वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
Vivo Y15A मध्ये कंपनीने मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर दिली आहे. त्याचबरोबर 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. वीवाचा हा फोन Android 11 वर आधारित FunTouch OS 11.1 वर चालतो. Vivo Y15A मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगपिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर मिळतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Vivo Y15A ची किंमत
Vivo Y15A स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट फिलीपीन्समध्ये 7,999 PHP (सुमारे 11,900 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. हा विवो फोन वॉटर ग्रीन आणि मिस्टिक ब्लू कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.