Vivo Y15s स्मार्टफोन यावर्षी फेब्रुवारीमध्ये भारतीय ग्राहकांच्या भेटीला आला आहे. हा हँडसेट MediaTek Helio P35 चिपसेट, 13MP rear camera आणि 5,000mAh battery अशा फीचर्सना सपोर्ट करतो. आता विवो फॅन्सना भेट देत कंपनीनं या मॉडेलची किंमत कायमस्वरूपी कमी केली आहे. लाँचनंतर फक्त काही दिवसांतच फोनच्या किंमतीत 500 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
Vivo Y15S ची नवीन किंमत
Vivo Y15s चा एकच 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज मॉडेल देशात आला आहे. लाँचच्या वेळी 10,990 रुपयांमध्ये आलेला हा फोन आता 10,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन भारतात ऑनलाइन व ऑफलाईन मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. कंपनीनं या फोनचे Mystic Blue आणि Wave Green असे दोन कलर व्हेरिएंट सादर केले आहेत.
Vivo Y15s चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y15s मध्ये कंपनीने मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेटची प्रोसेसिंग पावर दिली आहे. त्याचबरोबर 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा एक अँड्रॉइड गो एडिशनवर चालणार फोन आहे. Vivo Y15s मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगपिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर मिळतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Vivo Y15s मध्ये 6.51 इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो वॉटरड्रॉप नॉच आणि 720 पिक्सल रिजोल्यूशनसह सादर करण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी या डिवाइसमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच पॉवर बॅकअपसाठी यात 10वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.