शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
2
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
3
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
4
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
5
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
7
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
8
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
9
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
11
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
12
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
13
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
14
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
15
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
16
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
17
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
18
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
19
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
20
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."

कमी किंमतीत विवोची कमाल! 5000mAh बॅटरीसह शानदार Vivo Y15s केला लाँच  

By सिद्धेश जाधव | Published: November 09, 2021 3:38 PM

Budget Vivo Phone Vivo Y15s Price: Vivo Y15s कंपनीने Budget सेगमेंटमध्ये 3GB RAM, MediaTek Helio P35 चिपसेट, 13MP camera आणि 5,000mAh battery सह सादर केला आहे.

विवो अशी कंपनी आहे जी सर्वच प्राईस सेगमेंटमध्ये गुड लुकिंग फोन सादर करत असते. आता कंपनीने लो बजेट सेग्मेंटमध्ये Vivo Y15s नावाचा स्मार्टफोन सादर केला आहे. सध्या सिंगापूरमध्ये आलेला हा फोन लवकरच जगभरात सादर केला जाईल. हा Android Go वर चालणार फोन आहे, ज्यात MediaTek Helio P35 चिपसेट, 13MP camera आणि 5,000mAh battery असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.  

Vivo Y15s चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo Y15s मध्ये कंपनीने मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर दिली आहे. त्याचबरोबर 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा एक अँड्रॉइड गो एडिशनवर चालणार फोन आहे. Vivo Y15s मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगपिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर मिळतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. 

Vivo Y15s मध्ये 6.51 इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो वॉटरड्रॉप नॉच आणि 720 पिक्सल रिजोल्यूशनसह सादर करण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी या डिवाइसमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच पॉवर बॅकअपसाठी यात 10वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.  

Vivo Y15s ची किंमत 

सिंगापूरमध्ये हा फोन 179 डॉलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. ही किंमत 13,000 भारतीय रुपयांच्या आसपास रूपांतरित होते. Vivo Y15s चे Wave Green आणि Mystic Blue असे दोन कलर व्हेरिएंट विक्रीसाठी उपलब्ध होतील. हा फोन भारतात कधी येईल हे सध्यातरी सांगता येत नाही.  

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान