Vivo ने गेल्यावर्षी भारतात लो बजेट स्मार्टफोन Vivo Y1s लाँच केला होता. हा फोन कंपनीने फक्त 7,990 रुपयांमध्ये बाजारात आणला होता. आता या फोनला अपग्रेड करून वीवोने वाय1एसचा अजून एक नवीन व्हेरिएंट भारतात लाँच केला आहे. हा नवीन मॉडेल 3GB RAM सह लाँच झाला आहे, याची किंमत फक्त 9,490 रुपये आहे. (Vivo Y1s 3GB RAM Variant Launched in India in 9,490 Rs)
Vivo Y1s ची किंमत
Vivo Y1s च्या या नवीन व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनची किंमत 9,490 रुपये आहे. हा फोन Vivo वेबसाईटसोबत मोठ्या ऑनलाईन ईकॉमर्स साईट्सवरून विकत घेता येईल.
Vivo Y1s चे स्पेसिफिकेशन्स
वीवो वाय1एस मध्ये 720 x 1520 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.22 इंचाचा एचडी+ फुलव्यू एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे, जो फनटच ओएस 10.5 सह चालतो. फोनमध्ये मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 2 जीबी रॅम आणि 3 जीबी रॅम अश्या व्हेरिएंट्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. दोन्ही व्हेरिएंट 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात, हि स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता, Vivo च्या या स्वस्त स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तर, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या ड्युअल सिम फोनमध्ये सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी वीवो वाय1एस मध्ये 4,030एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.