विवोने गेल्या महिन्यात आपली फ्लॅगशिप X70 सीरिज भारतात सादर केली होती. कंपनीने या सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन सादर केले होते. या हायएंड सीरिजनंतर कंपनीने आपला मोर्चा बजेट स्मार्टफोनकडे वळवला आहे. Vivo ने आज भारतीय बाजारात Vivo Y20T लाँच केला आहे. या फोनमध्ये 6GB RAM, Snapdragon 662 चिपसेट, 13MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Vivo Y20T ची भारतीय किंमत
विवो वाय20टी स्मार्टफोनचा एकमेव व्हेरिएंट देशात आला आहे. यात 6GB रॅमसह 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. ज्याची किंमत 15,490 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन ऑनलाईन शॉपिंग साईटसह ऑफलाईन स्टोर्समधून विकत घेता येईल. कंपनीने Obsidian Black आणि Purist Blue अशा दोन रंगात सादर करण्यात आला आहे.
Vivo Y20T चे स्पेसिफिकेशन्स
विवो वाय20टी स्मार्टफोन 6.51 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएस 11.1 वर चालतो. कंपनीने यात 6GB रॅम + 1GB एक्सटेंडेड रॅम दिला आहे. तसेच यात स्मूद गेमिंगसाठी मल्टी टर्बो 5.0 टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
Vivo Y20T मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा बोकेह सेन्सर आहे. हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक आहे. विवो वाय20टी स्मार्टफोनमधील 5,000एमएएचची बॅटरी 18वॉट फास्ट चर्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.