विवोने बजेट सेगमेंटमध्ये नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला आहे. कंपनीने आपल्या वाय सीरिजमध्ये Vivo Y21 2021 स्मार्टफोन जोडला आहे. या फोनमध्ये विवोने एक्सटेंडेड रॅम फिचर दिले आहे. युजर्स या फोनमधील रॅम 1GB ने वाढवू शकतात. Vivo Y21 2021 मध्ये 5000mAh ची बॅटरी आणि Helio P35 चिपसेट देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या स्वस्त स्मार्टफोनचे फीचर्स स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.
Vivo Y21 चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y21 मध्ये कंपनीने 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिला आहे. हा एक वॉटरड्रॉप नॉच असलेला एलसीडी पॅनल आहे. जो 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशनआला सपोर्ट करतो. या विवो फोनमध्ये मीडियाटेकचा हीलियो पी35 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 वर आधारित फनटच ओएस 11.1 वर चालतो. हा फोन 4GB रॅम + 1GB एक्सटेंडेड रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 50MP कॅमेरा, 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh बॅटरीसह Xiaomi Redmi 10 स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत
Vivo Y21 च्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर कंपनीने 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या विवो फोनमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा मिळतो. साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असलेला हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 20 तासांच्या बॅकअपसह सर्वात किफायतशीर ट्रू वायरलेस स्टीरियो JBL इयरबड्स भारतात सादर
Vivo Y21 ची किंमत
Vivo Y21 स्मार्टफोन डायमंड ग्लो आणि मिडनाईट ब्लु अश्या दोन रंगात अॅमेझॉन इंडियावर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. या फोनच्या दोन व्हेरिएंटची किंमत पुढील प्रमाणे:
- 4GB RAM + 64GB Storage: 13,990 रुपये
- 4GB RAM + 128GB Storage: 15,490 रुपये