VIVO भारतात थांबायचं नाव घेत नाही, 2022 च्या पहिल्याच 21 दिवसांमध्ये कंपनीनं 4 स्मार्टफोन सादर केले आहेत. ‘वाय सीरीज’ मध्ये Vivo Y21T, Vivo Y33T आणि Vivo Y21e लाँच केल्यांनतर आज Vivo Y21A भारतीयांच्या भेटीला आला आहे. हा स्मार्टफोन 5GB RAM, 18W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh Battery सह भारतात आला आहे. Vivo Y21A सध्या फक्त विवो इंडियाच्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे आणि लवकरच हा खरेदीसाठी उपलब्ध होईल.
Vivo Y21A चे स्पेसिफिकेशन्स
विवो वाय21ए मध्ये 6.51 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर लाँच झाला आहे आणि फनटच ओएस 11.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी यात आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 4 जीबी रॅम मिळतो जो एक्सटेंडेड रॅम 2.0 टेक्नॉलॉजीनं 1जीबी पर्यंत वाढवता येतो. म्हणजे एकूण 5 जीबी रॅम आहे. हा फोन 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी मायक्रोएसडी कार्डनं 1टीबी पर्यंत वाढवता येते.
हा एक ड्युअल सिम फोन आहे ज्यात बेसिक कनेक्टिव्हिटी फिचरसह साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. फोटोग्राफीसाठी या नवीन विवो फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅश लाईटसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी एआय सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. डिवाइसमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवर बॅकअपसाठी विवो वाय21ए मध्ये 5,000एमएएच बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.
हे देखील वाचा:
Google Pay: बँकेत न जाता काही क्लिक्समध्ये करा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक, व्याजही आहे चांगलं
WhatsApp ग्रुप अॅडमिनचं काम सोपं नाही! या 5 चुका घडवू शकतात तुरुंगवास