Vivo Y21G स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे. भारतात हा फोन 5,000mAh बॅटरी, 4GB RAM आणि 13MP च्या कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एवढी मोठी बॅटरी असलेला हा सर्वात पातळ स्मार्टफोन आहे. तसेच कंपनीनं यात रॅम वाढवण्याचं फिचर देखील दिलं आहे. पुढे या मोबाईलच्या किंमत आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन्सची आम्ही दिली आहे.
Vivo Y21G चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y21G मध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी चार्ज करण्यासाठी 18W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळते. एवढी मोठी बॅटरी असलेला हा सर्वात स्लिम स्मार्टफोन असल्याचा दावा विवोनं केला आहे. या फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळते. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. तर व्हर्च्युअल रॅम फिचरमुळे 1GB अतिरिक्त रॅम देखील मिळेल. बेसिक कनेक्टिव्हिटीसह एक फिंगरप्रिंट सेन्सर देखील विवोनं दिला आहे.
विवोचा हा नवीन फोन Android 11 आधारित FunTouch OS 11.1 वर चालतो. यात MediaTek MT6769 प्रोसेसर देण्यात आला आहे. Vivo Y21G मध्ये 6.51 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात फ्लॅश लाईट 13MP चा मुख्य कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी सेन्सर आहे. बॅक मध्ये फ्लॅश लाईट पण देण्यात आली आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा कॅमेरा आहे.
Vivo Y21G ची किंमत
Vivo Y21G ची किंमत भारतात 13,990 रुपये ठेवण्यात आली आहे. या डिवाइसचा एकच 4GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट देशात आला आहे. फोनचे Diamond Glow आणि Midnight Blue असे दोन कलर व्हेरिएंट मात्र बघायला मिळतात. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे, परंतु विक्री कधी सुरु होईल हे सांगण्यात आलं नाही.