Vivo लवकरच आपल्या Y सीरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन भारतात सादर करणार आहे. हा फोन Vivo Y21T नावानं देशात येणार असल्याची माहिती 91mobiles नं दिली आहे. इतकेच नव्हे तर रिपोर्टनुसार हा फोन पुढील आठवड्यात ग्राहकांच्या भेटीला येईल. स्पेसिफिकेशन्सवरून हा फोन मिड-रेंजमध्ये सादर केला जाईल, हे स्पष्ट झाले आहे.
Vivo Y21T स्मार्टफोन भारतात 3 जानेवारीला लाँच केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन 18W फास्ट चार्जिंग, 128GB स्टोरेज आणि 5000mAh बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो. या डिवाइसची कंपनीनं अधिकृत माहिती दिली नाही, परंतु फोनमध्ये वॉटरड्रॉप स्टायल नॉच, आयताकृती कॅमेरा मॉड्यूल आणि IPS LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
Vivo Y21T चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Vivo Y21T स्मार्टफोन 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो. यातील स्टोरेज वाढवण्यासाठी कंपनी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देऊ शकते. हा विवो फोन 5,000mAh च्या बॅटरीसह बाजारात येईल. ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येईल. प्रोसेसिंगसाठी या Vivo स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 680 चिपसेट मिळू शकतो. तर फोटोग्राफीसाठी 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.
हे देखील वाचा:
लै भारी! 35 हजारांच्या डिस्काउंटसह स्मार्टफोन घेण्याची शेवटची संधी, पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर