Vivo Y21T स्मार्टफोन कंपनीनं गुपचूप सादर केला आहे. हा फोन भारतात लाँच केला आहे. लवकरच हा फोन जागतिक बाजारात पदार्पण करू शकतो. कंपनीनं या बजेट सेगमेंटमधील फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी, 50MP कॅमेरा, 18W फास्ट चार्जिंग आणि 6GB रॅम, असे स्पेसिफिकेशन्स दिले आहेत. चला जाणून घेऊया Vivo Y21T ची किंमत आणि सविस्तर स्पेक्स.
Vivo Y21T ची किंमत
Vivo Y21T ची किंमत 16,490 रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन मिडनाइट ब्लू आणि पर्ल व्हाइट कलर ऑप्शनमध्ये ऑफलाईन स्टोरमधून विकत घेता येईल.
Vivo Y21T चे स्पेसिफिकेशन्स
विवो वाय21टी मध्ये 6.51 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएसवर चालतो. कंपनीनं यात प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट दिला आहे. त्याचबरोबर एड्रेनो 610 जीपीयू देखील मिळतो. फोनमध्ये 6GB RAM आणि 2GB एक्सपांडेबल रॅम देण्यात आला आहे. सोबत 128GB ची इंटरनल स्टोरेज मिळते, जी 1TB पर्यंत मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते.
या विवो फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी सेन्सर, 2MP ची सेकंडरी लेन्स आणि 2MP तिसरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. सोबत बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.
हे देखील वाचा:
कायमस्वरूपी कपात! स्वस्त Samsung Galaxy A12 स्मार्टफोन झाला अजून स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत