Vivo जितकं लक्ष फ्लॅगशिप सेगमेंटकडे देत आहे, तितकंच लक्ष कंपनी बजेट सेगमेंटकडे देखील देत आहे. याचा प्रत्यय नुकत्याच लाँच झालेल्या Vivo Y33e 5G स्मार्टफोनमधून आला आहे. कंपनीनं चीनमध्ये हा नवा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन उतरवला आहे. यात 5000mAh ची बॅटरी, 13MP कॅमेरा आणि Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे.
Vivo Y33e 5G चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y33e 5G स्मार्टफोनमध्ये 6.51-इंचाचा LCD डिस्प्ले मिळतो. नॉच डिजाईनसह येणाऱ्या या स्क्रीनचं रिजोल्यूशन HD+ ठेवण्यात आलं आहे. विवोचा हा फोन Android 12 OS वर आधारित OriginOS Ocean UI वर चालतो. कंपनीनं यात मीडियाटेकचा Dimensity 700 चिपसेट दिला आहे. फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. जी वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट मिळतो.
विवोच्या या फोनमध्ये सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डिवाइसच्या मागे ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 13 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे, सोबत 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह कंपनीनं यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा दिली आहे. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 10W चार्जिंग स्पीडसह मिळते.
किंमत
Vivo Y33e 5G स्मार्टफोन चीनमध्ये जूनमध्ये विक्रीस येईल. या फोनचा एकमेव 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला मॉडेल लाँच करण्यात आला आहे. या विवो फोनची किंमत 1299 युआन (सुमारे 15,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. जो फ्लोराईट ब्लॅक आणि मॅजिक ब्लू कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.