Vivo नं चीनमध्ये Y-सीरीजमध्ये Vivo Y33s 5G स्मार्टफोन सादर केला आहे. हा जुन्या Vivo Y33s चा अपग्रेडेड व्हर्जन आहे. लवकरच हा फोन जागतिक बाजारात देखील सादर केला जाईल. Vivo Y33s 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, 13MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह लाँच झाला आहे. पुढे आम्ही या स्मार्टफोनच्या किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती दिली आहे.
Vivo Y33s 5G ची किंमत
Vivo Y33s 5G स्मार्टफोन 4GB च्या रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 1299 युआन (सुमारे 15,500 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 1399 युआन (सुमारे 16,700 रुपये) मोजावे लागतील. हा फोन स्नो डॉन, ब्लॅक आणि नेबूला ब्लू कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.
Vivo Y33s 5G चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y33s 5G स्मार्टफोनमध्ये 6.58 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 700 SoC देण्यात आला आहे. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज मिळते. ही स्टोरजे मायक्रो एसडी कार्डनं वाढवता येते. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित ओरिजन ओशियन युआयवर चालतो.
Vivo Y33s 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 13MP चा प्रायमरी सेन्सर, 2MP मॅक्रो कॅमेरा मिळतो. फोनमध्ये सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात सिक्योरिटीसह साईड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. Vivo चा हा फोन 5000mAh ची बॅटरीसह सादर केला गेला आहे. या फोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग मिळते.
हे देखील वाचा: