दिवाळीच्या आधी स्मार्टफोन्सची विक्री वाढवी म्हणून कंपन्या डिस्काउंट देत आहेत. परंतु विवोने आपल्या ‘वाय’ सीरीजमधील Vivo Y33s स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे. हा फोन 8GB RAM, 50MP Camera, 5000mAh Battery आणि MediaTek Helio G80 चिपसेटसह भारतात सादर करण्यात आला आहे. लाँचच्या वेळी या फोनची किंमत 17,990 रुपये ठेवण्यात आली होती.
Vivo Y33s ची नवीन किंमत
Vivo Y33s स्मार्टफोन कंपनीने भारतात 17,990 रुपयांमध्ये सादर करण्यात आला होता. आता कंपनीने या फोनची किंमत 1,000 रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे आता हा फोन 18,990 रुपयांमध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. हा फोन व्हेरिएंट मिडडे ड्रीम आणि मिरर ब्लॅक अश्या दोन रंगात विकत घेता येईल. विवोच्या अधिकृत वेबसाईट आणि Amazon, Flipkart, Paytm, आणि Tatacliq अश्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरून Vivo Y33s विकत घेता येईल.
Vivo Y33s चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y33s मधील डिस्प्ले तिन्ही कडा बेजल लेस आणि रुंद चीन पार्टसह सादर करण्यात आला आहे. हा एक 6.58-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. वॉटर ड्रॉप नॉच असलेला हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 2408x1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या विवो फोनमध्ये मीडियाटेकचा हीलियो जी80 चिपसेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB रॅमसह 4GB एक्सटेंडेड रॅम मिळतो, एकूण या फोनमध्ये 12GB रॅम वापरता येतो. या फोनमध्ये 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएस 11.1 सह चालतो.
Vivo Y33s स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा तिसरा सेन्सरला मिळतो. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. साईड माउंटेड फिंगरप्रिंटसह या फोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स देण्यात आले आहेत. विवो वाय33एस मधील 5,000एमएएचची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.