Vivo नं यावर्षी भारतात आपल्या वाय सीरिजमध्ये अनेक स्मार्टफोन सादर केले आहेत. सुरुवातीच्या 20-25 दिवसांत कंपनीनं 4 फोन सादर केले आहेत. यातील एक म्हणजे Vivo Y33T स्मार्टफोन. हा फोन एकच व्हेरिएंटमध्ये कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या दोन्ही प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया याची किंमत आणि ऑफर्स.
Vivo Y33T ची किंमत आणि ऑफर्स
Vivo Y33T च्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 18,990 रुपये ठेवण्यात आली आहे. Flipkart वर हा फोन 659 रुपयांच्या मासिक हप्त्यावर विकत घेता येईल. तसेच फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड धारकांना 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तुमचा फोन एक्सचेंज करून तुम्ही आणखीन 15,850 रुपये वाचवू शकता.
Amazon India वर या फोनच्या ईएमआयची सुरुवात 894 रुपयांपासून होते. तर इथे HSBC बँकेच्या कार्डवर 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तसेच नो-कॉस्ट EMI आणि 14,950 रुपये पर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे. हा फोन कंपनीच्या वेबसाईट आणि ऑफलाईन रिटेल स्टोर्सवर देखील मिड डे ड्रीम आणि मिरर ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे.
Vivo Y33T चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y33T मध्ये 6.58-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनला Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरची पॉवर देण्यात आली आहे. सोबत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज माक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1टीबी पर्यंत वाढवता येते. यातील 5000mAh ची मोठी बॅटरी 18W फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येईल.
फोटोग्राफीसाठी Y33T मध्ये ट्रिपल-कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP चा मुख्य कॅमेरा सेन्सर आहे सोबत 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ v5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, एफएम रेडिओ आणि यूएसबी टाईप सी पोर्ट असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स देण्यात आले आहेत.
हे देखील वाचा: