Vivo Y33T आज भारतात लाँच झाला आहे. हा स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर, 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. या फोनचा एकमेव व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. ज्याची किंमत 18,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन मिरर ब्लॅक आणि मिडडे ड्रीम अशा दोन रंगात विकत घेता येईल. हा फोन विवो इंडिया ई-स्टोर, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम, टाटाक्लिक, बजाज फिनसर्व ईएमआय स्टोर आणि रिटेल स्टोरवरून विकत घेता येईल.
Vivo Y33T चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y33T मध्ये 6.58-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनला Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरची पॉवर देण्यात आली आहे. सोबत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज माक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1टीबी पर्यंत वाढवता येते. यातील 5000mAh ची मोठी बॅटरी 18W फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येईल.
फोटोग्राफीसाठी Y33T मध्ये ट्रिपल-कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP चा मुख्य कॅमेरा सेन्सर आहे सोबत 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ v5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, एफएम रेडिओ आणि यूएसबी टाईप सी पोर्ट असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स देण्यात आले आहेत.
हे देखील वाचा:
28 हजारांत iPhone तर 7 हजारांत अँड्रॉइड; 10 स्मार्टफोनवर मिळतायत ढासू ऑफर