विवोने आपल्या वाय सीरीजमध्ये Vivo Y3s हा नवीन फोन भारतात सादर केला आहे. हा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन 5000mAh Battery, MediaTek Helio P35 प्रोसेसर आणि 2GB RAM सह सादर करण्यात आला आहे. हा फोन रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करतो. त्यामुळे या फोनमधील चार्जच्या मदतीने दुसरा फोन किंवा डिवाइस चार्ज करता येईल.
Vivo Y3s Price In India
Vivo Y3s च्या एकमेव व्हेरिएंटची किंमत 9,490 रुपये ठेवण्यात आली आहे. ज्यात 2GB RAM आणि 32GB स्टोरेज मिळते. विशेष म्हणजे आजपासूनच हा फोन विवो ई-स्टोर, अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, टाटा क्लिक, पेटिएमसह ऑफलाईन स्टोर्सवरून विकत घेता येईल. पुढील तीन महिन्यासाठी कंपनीने Vivo Y3s च्या खरेदीवर नो-कॉस्ट ईएमआय ऑफरची घोषणा केली आहे.
Vivo Y3s चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y3s स्मार्टफोनमध्ये 6.51-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. वर सांगितल्याप्रमाणे हा फोन MediaTek Helio P35 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. हा फोन Android 11 Go Edition आधारित Funtouch OS 11 वर चालतो. तसेच यात 2GB RAM आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज 1TB पर्यंत मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि तर सेल्फीसाठी 5MP फ्रंट कॅमेरा मिळतो. या ट्रूली ड्युअल सिम फोनमध्ये Bluetooth 5.0, Wi-Fi, GPS आणि मायक्रो यूएसबी पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी ऑप्शन देण्यात आले आहेत. यातील 5000mAh ची बॅटरी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, जी रिवर्स चार्जिंग फिचरला सपोर्ट करते.