Vivo ने ‘वाय’ सीरीजचा विस्तार सुरूच ठेवला आहे. कंपनीने Vivo Y15A, Vivo Y15s आणि Vivo Y76s नांतर आता Vivo Y50t नावाचा नवीन स्मार्टफोन नावाने लाँच केला आहे. हा फोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे आणि लवकरच हा फोन भारतासह जगभरात उपलब्ध होईल. हा फोन 8GB RAM, Snapdragon 720G चिपसेट आणि 48MP Camera या फीचर्ससह बाजारात आला आहे.
Vivo Y50t चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y50t मध्ये 6.58 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक 1080 x 2480 पिक्सल रिजोल्यूशन असलेला आयपीएस एलसीडी पॅनल आहे. हा डिवाइस अँड्रॉइड 11 आधारित ओरिजनओएस 1.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये ऑक्टकोर प्रोसेसर आणि क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 720जी चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8GB RAM आणि 4GB एक्सटेंडेड रॅम देण्यात आला आहे. या फोनमधील 128GB इंटरनल स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Vivo Y50t स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह Vivo Y50t मध्ये साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन 4500mAh च्या बॅटरीला सपोर्ट करतो, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Vivo Y50t ची किंमत
Vivo Y50t ची किंमत 1399 Yuan ठेवण्यात आली आहे. ही किंमत 16,300 रुपयांच्या आसपास रूपांतरित होते.