Vivo उद्या म्हणजे 10 जूनला भारतात ‘वाय’ सीरीजमध्ये नवीन Vivo Y73 लाँच करणार आहे. हा फोन मिड बजेट सेग्मेंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो ज्याची किंमत 17,000 रुपयांच्या आसपास असू शकते. भारतात वीवो वाय73 लाँच करण्यापूर्वी वीवोने चीनमध्ये Vivo Y53s 5G फोन लाँच केला गेला आहे. या फोनमध्ये 8GB RAM, Snapdragon 480 SoC आणि 64MP कॅमेरा असे फीचर्स आहेत.
Vivo Y53s 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स
वीवो वाय53एस 5जी मध्ये कंपनीने 6.58 इंचाचा मोठा फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिला आहे. हा एक आयपीएस एलसीडी पॅनलव आहे, जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. Vivo Y53s 5G फोन अँड्रॉइड 11 ओएसवर आधारित OriginOS 1.0 सह चालतो. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट देण्यात आला आहे. या चिपसेटला एड्रेनो 619 जीपीयूची जोड देण्यात आली आहे.
Vivo Y53s 5G फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेन्सर आणि दुसरी मॅक्रो लेंस आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Vivo Y53s 5G मध्ये 5,000एमएएचची बॅटरी पावर बॅकअपसाठी देण्यात आली आहे, हि बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.
Vivo Y53s 5G ची किंमत
nashvillechatterclass ने दिलेल्या माहितीनुसार, Vivo Y53s 5G चीनमध्ये दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला आहे. फोनचा छोटा व्हेरिएंट 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही व्हेरिएंट्सची किंमत 1,799 CNY आणि 1,999 CNY आहे, भारतीय चालनानुसार हि किंमत अनुक्रमे 20,500 रुपये आणि 22,000 रुपयांच्या आसपास आहे.