काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि Vivo भारतात Vivo Y53s स्मार्टफोन लाँच करणार आहे. त्यानुसार आज कंपनीने अधिकृतपणे या स्मार्टफोनची घोषणा केली आहे. Vivo Y53s भारतात 8GB रॅम, हेलीयो जी85 चिपसेट आणि 5000mAh ची बॅटरी असे दमदार स्पेसिफिकेशन देण्यात आले आहेत. Vivo Y53s स्मार्टफोन रिटेल स्टोर्ससह ऑनलाईन शॉपिंग साइट्सवरून 19,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Vivo Y53s चे स्पेसिफिकेशन्स
विवो वाय53एस मध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. या डिस्प्लेचा आकार 6.58-इंच आहे आणि हा 2408 × 1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या विवो फोनमध्ये Helio G85 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 8GB फिजिकल रॅम आणि 3GB रॅम वर्च्युल रॅम देण्यात आला आहे. तसेच या फोनमधील 128GB स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. Vivo Y53s मध्ये अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएस 11.1 मिळतो.
फोटोग्राफीसाठी या विवो फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यातील मुख्य सेन्सर 64 मेगापिक्सलचा आहे, त्याचबरोबर 2 मेगापिक्सलची बोका लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. Vivo Y53s मधील 5000mAh ची दमदार बॅटरी 18W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.