Vivo Y54S 5G स्मार्टफोन लवकरच भारतीयांच्या भेटीला येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार हा फोन याच महिन्यात सादर केला जाईल किंवा एप्रिलच्या सुरुवातीला याची एंट्री होईल. चीनमध्ये हा फोन गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये सादर करण्यात आला होता. परंतु या फोनच्या भारतीय व्हेरिएंटमध्ये बदल असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विवोनं मात्र Vivo Y54S 5G फोनच्या भारतीय लाँचची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. चीनमध्ये या फोनचा एकमेव 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंट आला होता. तिथे या मॉडेलची किंमत 1,699 युआन ठेवण्यात आली आहे. ही किंमत 20 हजार भारतीय रुपयांच्या आसपास रूपांतरित होते.
Vivo Y54s चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y54s स्मार्टफोनमध्ये 6.51-इंचाचा फुल एचडी+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 13MP प्रायमरी सेन्सर, 2MP चा सेकंडरी सेन्सर आणि LED फ्लॅश देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
फोनमध्ये MediaTek Dimensity 700 SoC ची ताकद देण्यात आली आहे, जो एक 5G चिपसेट आहे. त्याचबरोबर 6GB रॅम आणि 2GB व्हर्च्युअल रॅम मिळतो, या फोनमध्ये 128GB स्टोरेज आहे. विवोचा हा फोन Android 11 वर आधारित OriginOS 1.0 वर चालतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या मोबाईलमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. Vivo Y54s स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.
हे देखील वाचा: