विवो भारतात आपल्या नव्या ‘टी’ सीरिजचा लवकरच विस्तार करणार आहे. परंतु जागतिक बाजारात मात्र कंपनीनं वाय सीरिजमध्ये नवीन डिवाइस सादर करत आहे. आता कंपनीनं व्हियेतनाममध्ये Vivo Y55 4G स्मार्टफोन सादर केला आहे. या मोबाईलमध्ये 8GB RAM, Snapdragon 680 चिपसेट, 50MP Camera, 44W fast charging आणि 5,000mAh Battery असे दमदार स्पेक्स देण्यात आले आहेत.
Vivo Y55 4G चे स्पेसिफिकेशन्स
विवो वाय55 4जी फोन 6.44 इंचाच्या अॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात आला आहे. वॉटरड्रॉप नॉच असलेली ही स्क्रीन 408पीपीआय, 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि डीसीआई-पी3 कलर गामुटला सपोर्ट करते. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित फनटचओएस 12 सह आला आहे. प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट मिळतो. सोबत 8GB रॅम व 4GB व्हर्च्युअल रॅम देण्यात आला आहे. तसेच 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.
फोनच्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅश, 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह देण्यात आला आहे. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह यात बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी 44वॉट फास्ट चार्जिंगसह मिळते. जी सिंगल चार्जमध्ये 18 तास युट्युब आणि 10 तास पबजी खेळण्याइतका बॅकअप देते, असा दावा कंपनीनं केला आहे.
किंमत
व्हिएतनाममध्ये विवो वाय55 4जी फोन 69,90,000 VND म्हणजे भारतीय करंसीनुसार जवळपास 23,000 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. या फोनचे Snow White आणि Black Star कलर व्हेरिएंट बाजारात आले आहेत. लवकरच भारतात देखील या हँडसेटची एंट्री होऊ शकते.