Vivo नं आपला नवीन मिड रेंजमधील स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीनं Vivo Y55 5G फोन सध्या जागतिक बाजारात आला आहे. हा स्मार्टफोन 4GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह तैवानमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन भारतात कधी येईल हे मात्र अजूनही समजले नाही.
Vivo Y55 5G ची किंमत
Vivo Y55 5G स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट सादर करण्यात आला आहे. तैवानमध्ये याची किंमत 7,990 NTD ठेवण्यात आली आहे. ही किंमत सुमारे 21,500 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.
Vivo Y55 5G चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y55 5G स्मार्टफोनमध्ये 6.58 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक FHD डिस्प्ले आहे, जो 20:9 अस्पेक्ट रेश्यो आणि 81 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्योला सपोर्ट करतो. यात मीडियाटेकचा Dimensity 700 चिपसेट देण्यात आला आहे. विवोचा हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित कस्टम स्किन Funtouch OS 12 वर चालतो.
सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Vivo Y55 5G स्मार्टफोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात प्रायमरी कॅमेरा 50MP सेन्सरसह 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. यातील 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहेत. ही बॅटरी 18W फास्ट चार्जला सपोर्ट करते.
हे देखील वाचा:
Google Chrome: चुकूनही अपडेट करू नका गुगल क्रोम ब्राऊजर; मायक्रोसॉफ्ट एज युजर्सनाही सावधानतेचा इशारा