Vivo ने आज भारतात आपल्या वी सीरिजमध्ये नवीन Vivo Y72 5G लाँच केला आहे. हा 5G स्मार्टफोन 12GB रॅम आणि Snapdragon 480 चिपसेटसह फक्त 20,990 रुपयांमध्ये बाजारात लाँच करण्यात आला आहे. या विवोस्मार्टफोनसोबत कंपनीने अनेक ऑफर्स दिल्या आहेत. विवो वाय72 5जी च्या खरेदीवर बॅंक कॅशबॅक आणि डिस्काउंट सोबतच 10,000 रुपयांचे Jio benefits देखील मिळतील. (vivo Y72 5G launched in India with Snapdragon 480, 90Hz refresh rate)
Vivo Y72 5G ची किंमत
विवो वाय72 5जी च्या एकमेव 8GB रॅम मॉडेलची किंमत 20,990 रुपये ठेवण्यात आली आहे. HDFC, ICICI आणि Kotak बँकेच्या कार्डने हा फोन विकत घेतल्यास 1,500 रुपयांचा फ्लॅट कॅशबॅक मिळेल. तसेच Vivo Y72 5G सोबत वन टाईम स्क्रीन रिप्लेसमेंट आणि 10,000 रुपयेचे Jio benefits मिळतील.
Vivo Y72 5G चे स्पेसिफिकेशन्स
विवो वाय72 5जी मध्ये 2408 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.58 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवला सपोर्ट करतो. हा अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएसवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या विवो फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट देण्यात आला आहे. Vivo Y72 5G मध्ये 8GB रॅम + 4GB वर्चुअल रॅम देण्यात आला आहे. तसेच यात 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. सिक्योरिटीसाठी यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.
Vivo Y72 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर 2 मेगापिक्सलच्या सेकंडरी लेन्ससह देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 5,000एमएएचची बॅटरीला सपोर्ट करतो. ही बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.