Vivo भारतात आपला प्रॉडक्ट पोर्टफोलियो वाढवणार आहे. कंपनी लवकरच 5जी स्मार्टफोन बाजारात घेऊन येऊ शकते. येत्या 15 जुलैला भारतात नवीन विवो फोन Vivo Y72 5G लाँच केला जाऊ शकतो. 91मोबाईल्सने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे कि विवो वाय72 5जी भारतात 22,990 रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो.
Vivo Y72 5G ची किंमत
विवो वाय72 5जी च्या 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत 22,990 रुपये असू शकते. तसेच कंपनी या फोनसह ऑफर देखील सादर करणार आहे. या ऑफर्समध्ये HDFC Bank, ICICI Bank आणि Kotak Bank च्या कार्डसह 1,500 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. तसेच Vivo Y72 5G विकत घेतल्यावर वन टाईम स्क्रीन रिप्लेसमेंट आणि 10,000 रुपयांचे Jio benefits देखील मिळतील, अशी माहिती 91मोबाईल्सने दिली आहे.
Vivo Y72 5G चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y72 5G मध्ये 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.58 इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा वीवो फोन अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएस 11 वर लॉन्च केला आहे जो मीडियाटेक डायमनसिटी 700 चिपसेटवर चालतो. हा फोन 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.
Vivo Y72 5G ट्रिपल रियर कॅमेर्याला सपोर्ट करतो. यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर देण्यात आला आहे. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोन साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरसह 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.