Vivo इंडियाचे डायरेक्टर निपुण मार्या यांनी ट्विटरवरून खुलासा केला आहे कि ‘वाय’ सिरीजमध्ये नवीन फोन लाँच केला जाणार आहे. या फोनचे नाव Vivo Y73 (2021) असे असेल. पुढील काही दिवसांत हा फोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Vivo Y73 ची माहिती देताना कंपनीचे डायरेक्टर निपुण मार्या यांनी एक टीजर ईमेज शेयर केली आहे ज्यात फोनच्या बॅक पॅनलचा फोटो देखील दाखवण्यात आला आहे. हा Vivo V21 स्मार्टफोन सारखा दिसत आहे आणि मोबाईलच्या मागील बाजूस डायमंड कट डिजाईन दिसत आहे. लवकरच कंपनी Vivo Y73 ची लाँच डेट सांगेल, अशी आशा आहे. (Vivo Y73 coming may launch India soon)
Vivo Y73 (2021)
काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार, वीवो वाय73 2021 मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.44 इंचाचा फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असेल. हा एक अॅमोलेड पॅनल असेल. वीवोचा हा आगामी स्मार्टफोन अँड्रॉइड 11 ओएसवर लाँच केला जाईल. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेकचा हीलियो जी95 चिपसेट आणि माली जी76 जीपीयू देण्यात येईल. लीकनुसार, हा फोन 8 जीबी रॅम आणि 3 जीबी अॅडीशनल रॅम देखील दिला जाईल.
वीवो वाय73 (2021) ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लाँच होईल. रिपोर्टनुसार, फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेन्सर दिला जाईल. या मुख्य सेन्सर सोबत 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि डेफ्थ मिळेल. फोनमधील फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सलचा असेल. पावर बॅकअपसाठी Vivo Y73 (2021) मध्ये 4,000एमएएचची बॅटरी असल्याचे समोर आले आहे, हि बॅटरी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल.