Vivo Y76 5G च्या लाँच डेटची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीने एक टीजर व्हिडीओ शेयर करून हा फोन बाजारात येत असल्याचे सांगितले आहे. हा फोन 23 नोव्हेंबरला मलेशियायामध्ये सादर केला जाईल. टीज केलेल्या व्हिडीओनुसार हा फोन 3 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल. मलेशियात उपलब्ध झाल्यानंतर हा फोन भारतासह जगभरात लाँच केला जाईल.
Vivo Y76 5G संभाव्य स्पेसिफिकेशन्स
टीजरमध्ये या फोनच्या वॉटरड्रॉप नॉच डिजाईनची माहिती मिळाली आहे. तसेच बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 50MP चा मेन कॅमेरा, 2MP ची पोट्रेट लेन्स आणि 2MP ची मॅक्रो लेन्स असेल. याव्यतिरिक्त कंपनीने अन्य फीचर्सची कोणतीही माहिती दिली नाही.
टिपस्टर सुधांशु अंभोरेनुसार, Vivo Y76 5G स्मार्टफोन 6.58 इंचाच्या Full-HD+ LCD डिस्प्लेसह सादर केला जाईल. यात MediaTek Dimensity 700 चिपसेट, 8GB RAM, 4GB एक्सटेंडेड RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळू शकतो. हा फोन 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. हा Android 11 वर चालणारा फोन 4100mAh च्या बॅटरीसह बाजारात येईल. ही बॅटरी 44W Falsh फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.सिक्योरिटीसाठी Vivo Y76 5G मध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळू शकतो. तसेच यात 3.5mm का ऑडियो जॅक मिळेल.