विवोने सतत स्मार्टफोन सादर करण्याचा सपाटा सुरु ठेवला आहे. गेल्या दोन दिवसांत कंपनीने Vivo V23e आणि Vivo Y15s सादर केले आहेत. आता पुन्हा एकदा आपल्या ‘वाय’ सीरीज अंतगर्त Vivo ने एक नवीन स्मार्टफोन Vivo Y76s नावाने लाँच केला आहे. चीनमध्ये सादर झालेला हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे जो MediaTek Dimensity 810 चिपसेटसह बाजारात आला आहे.
Vivo Y76s चे स्पेसिफिकेशन्स
विवो वाय76एस मध्ये 6.58 इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक वॉटरड्रॉप नॉच असलेला पॅनल आहे. हा डिवाइस अँड्रॉइड 11 ओएससह ओरिजनओएस 1.0 वर चालतो. तसेच वर सांगतिल्याप्रमाणे यात मीडियाटेकचा डिमेनसिटी 810 चिपसेट देण्यात आला आहे. या मोबाईलमधील 8GB RAM कमी पडल्यास 4GB व्हर्च्युअल रॅमची मदत घेता येईल. हा फोन 256GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.
फोटोग्राफीसाठी Vivo Y76s च्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनमध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स, साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फोन फेस अनलॉक फिचर आहे. विवो वाय76एस मध्ये कंपनीने 4100mAh ची बॅटरी दिली आहे, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Vivo Y76s ची किंमत
विवो वाय76एस चे दोन व्हेरिएंट बाजारात आले आहेत. फोनचा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 1799 युआन म्हणजे 20,800 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 8GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 1999 युआन अर्थात 23,100 रुपये मोजावे लागतील.