VIVO काही थांबायचं नाव घेत नाही. कंपनीनं गेल्या महिन्यात एक-दोन नव्हे तर 5 स्मार्टफोन भारतात सादर केले आहेत. हे सर्व फोन्स वाय सीरिजमध्ये उतरवण्यात आले आहेत. तसेच आता अजून एका विवो वाय सीरिजच्या स्मार्टफोनची बातमी आली आहे. जो Vivo Y7x नावानं भारतात लाँच केला जाईल. लाँच होण्याआधीच या स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.
Vivo Y7x चे लीक स्पेसिफिकेशन्स
Vivo Y7x संबंधित लीकनुसार, हा मोबाईल फोन 6.44 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह बाजारात येईल. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा विवो फोन अँड्रॉइड 11 बेस्ड फनटचओएसवर चालेल. या फोनला मीडियाटेकच्या हीलियो जी96 ची प्रोसेसिंग पावर मिळेल. सोबत 8 जीबी रॅम आणि 256 जीबी की इंटरनल स्टोरेज मिळू शकेल. बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससह सिक्योरिटीसाठी या विवो फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल.
Vivo Y7x ची लाँच डेट आणि किंमत
Vivo Y7x कंपनी फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत किंवा मार्चच्या सुरुवातीला सादर कारण आहे. लीकनुसार भारतात विवो वाय7एक्स स्मार्टफोनची किंमत 18,000 रुपयांच्या आसपास ठेवली जाऊ शकते. हा यावर्षी वाय सीरिजमध्ये लाँच होणारा 6 वा स्मार्टफोन असेल. जो कंपनीच्या वेबसाईट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्ससह ऑफलाइन रिटेल स्टोर्सवरून देखील विकत घेता येईल.
हे देखील वाचा: