नवी दिल्ली : कोरोना महामारी आल्यापासून इंटरनेट सेवेचा वापर 10 पट वाढला आहे. कोरोनामुळे अनेक शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये सर्व बंद आहेत. अशा परिस्थितीत लोक आपले कार्यालयीन काम आणि शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी आपला अभ्यास इंटरनेटद्वारे ऑनलाइन करत आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या घरात चांगल्या इंटरनेट कनेक्शनची मागणी करतो, जेणेकरून काम लवकर आणि सुलभ पद्धतीने करता येईल. (vodafone, idea, airtel, jio best recharge plan of 4gb data daily by giving just 8 rupees per day)
जर, तुमच्याकडे ब्रॉडबँड इंटरनेट नसल्यास, तुम्हाला टेलिकॉम कंपन्यांच्या प्रीपेड प्लॅनचा वापर करू शकता, ज्यामध्ये युजर्सला 4 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. विशेष म्हणजे, कंपन्यांचे काही प्लन असेही आहेत ज्यात दररोज फक्त 8 रुपये खर्च करून 4 जीबी डेटा मिळत आहे.
व्होडाफोन-आयडिया प्लॅन499 रुपयांच्या व्होडाफोन-आयडिया प्लॅनमध्ये युजर्सला दररोज 4 जीबी डेटा दिला जातो, ज्याची वैधता 56 दिवस आहे. म्हणजेच, दररोज केवळ 8 रुपये खर्च करून ग्राहक या डेटाचा फायदा मिळवू शकतात. याचबरोबर, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलसह दररोज 100 एसएमएस मोफत मिळत आहेत. या प्लॅनमध्ये युजर्सला बिंज ऑल नाइट आणि वीकेंड डेटा रोलओव्हर बेनिफिट सुद्धा दिले जात आहे. तसेच, या प्लॅनमध्ये Movies आणि TV अॅपचे मोफत सब्सक्रिप्शन मिळत आहे.
जिओचा 349 रुपयांच्या प्लॅनजिओच्या 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा दिला जातो, ज्याची वैधता 56 दिवस आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस मिळतात. जिओच्या या प्लॅनमध्ये युजर्सला जियो अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन देण्यात आले आहे.
एअरटेलचा 558 रुपयांचा प्लॅनएअरटेलच्या 558 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 3 जीबी डेटा मिळत आहे. ज्याची वैधता 56 दिवसांची आहे. जे लोक दररोज जास्त इंटरनेटचा वापर करतात, त्यांच्यासाठी हा प्लॅन अधिक चांगला आहे.