शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
2
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
3
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
4
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
5
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
6
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
7
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
8
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
9
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
10
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
11
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
12
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
13
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
14
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
15
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
16
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
17
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
18
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
19
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
20
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन

जिओ-एअरटेलला धोबीपछाड; कॉल क्वॉलिटीत Vi पुन्हा एकदा 'नंबर वन' 

By देवेश फडके | Published: January 07, 2021 4:22 PM

डिसेंबर २०२० मध्ये Vi ची कॉल क्वॉलिटी जिओ आणि एअरटेल यांसह अन्य टेलिकॉम कंपन्यांपेक्षा अतिशय चांगली होती. ट्रायकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली.

ठळक मुद्देVi चा कॉल क्वॉलिटीच्या यादीतील प्रथम क्रमांक कायमAirtel ला मागे टाकत BSNL दुसऱ्या क्रमांकावर Jio ला इनडोर कॉल क्वॉलिटीत ३.९ रेटिंग

नवी दिल्ली : कॉल क्वॉलिटीमध्ये Vodafone Idea (Vi) ने पुन्हा एकदा जिओ आणि एअरटेलला मागे टाकले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२० मध्ये Vi ची कॉल क्वॉलिटी Jio आणि Airtel यांसह अन्य टेलिकॉम कंपन्यांपेक्षा अतिशय चांगली होती. या यादीत एअरटेल सर्वांत तळात असल्याचे समजते. 

TRAI च्या संकेतस्थळावर MyCall नावाचा एक डॅशबोर्ड आहे. या ठिकाणी यासंदर्भातील सर्व माहिती मिळवता येऊ शकते. डिसेंबर २०२० मध्ये केवळ आयडियाला ५ पैकी तब्बल ४.९ गुण मिळाले आहेत. तर व्होडाफोनला ५ पैकी ४.३ गुण मिळाले आहेत. या यादीत व्होडाफोन दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, आताच्या घडीला व्होडाफोन आणि आयडिया एकत्रितपणे Vi ब्रॅण्ड अंतर्गत काम करत आहेत. मात्र, आयडियाच्या ग्राहकांसाठी ही आनंदाची बाब असल्याचे सांगितले जात आहे. 

ट्रायकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कॉल क्वॉलिटीच्या यादीत Vi पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. तर BSNL आणि Jio या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांना ५ पैकी ३.९ गुण मिळाले आहेत. BSNL आणि Jio दोन्ही कंपन्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर या यादीत सर्वांत तळात एअरटेल आहे. Airtel ला कॉल क्वॉलिटीसाठी ५ पैकी ३.१ गुण मिळाले आहेत. 

युझर्सकडून मिळालेल्या फीडबॅकवरून ट्रायकडून हा डेटा तयार केला जाते. इनडोर कॉल क्वॉलिटीत व्होडाफोनला ४.४ रेटिंग तर, आउटडोरमध्ये ३.८ रेटिंग मिळाले आहे. इनडोर आणि आउटडोर कॉल क्वॉलिटीचे मिळून कंपनीचे सरासरी ४.९ गुण होतात. BSNL ला इनडोर कॉलिंगमध्ये ३.८ रेटिंग आणि आउटडोर कॉल क्वॉलिटीत ४.३ ची रेटिंग युझर्सकडून देण्यात आले आहेत. याप्रमाणे Jio ला इनडोर कॉल क्वॉलिटीत ३.९ रेटिंग देण्यात आली आहे. दरम्यान, नोव्हेंबर २०२० मध्येही Vi ने कॉल क्वॉलिटीत रिलायन्स जिओ आणि एअरटेलला मागे टाकत यादीत प्रथम क्रमांक पटकावला होता.

 

टॅग्स :MobileमोबाइलVodafoneव्होडाफोनIdeaआयडियाJioजिओBSNLबीएसएनएलTRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय