नवी दिल्ली :व्होडाफोन-आयडिया (Vi) या टेलिकॉम कंपनीने पोस्टपेड प्लानची किंमत वाढवून युझर्सना मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्रासह अन्य चार राज्यांत Vi चे प्लान महागले आहेत. सुरुवातीला उत्तर प्रदेशमधील पूर्व सर्कलमध्ये प्लानची किंमत वाढवल्यानंतर आता चेन्नई, कोलकाता, महाराष्ट्र आणि गोवा या टेलिकॉम सर्कलमधील प्लानची किंमत वाढवण्यात आली आहे. (Vodafone Idea Postpaid Plans Hikes Prices)
Vi 598 Plan आणि Vi 699 Plan प्लान च्या किंमतीत वाढ झाली आहे. तामिळनाडू, चेन्नई, कोलकाता, महाराष्ट्र आणि गोवा टेलिकॉम सर्कलमधील युझर्संना ५९८ रुपये आणि ६९९ रुपयांच्या फॅमिली पोस्टपेड प्लान्ससाठी यानंतर अनुक्रमे ६४९ रुपये आणि ७९९ रुपये मोजावे करावे लागणार आहेत. याचाच अर्थ ५९८ रुपयांचा प्लान ५१ रुपयांनी आणि ६९९ रुपयांची प्लान १०० रुपयांनी महाग झाला आहे.
FAU-G ला दणका! गुगल प्ले स्टोरवरील रेटिंग ४.७ वरून थेट ३.२ वर
Vi चा ७९९ रुपयांचा प्लान
Vi च्या या प्लानमध्ये युझर्सना तीन कनेक्शन ऑफर केली जातात. एक प्रायमरी आणि दोन सेकंडरी कनेक्शनचा यात समावेश आहे. या प्लानमध्ये एकूण १२० जीबी डेटा युझर्सला दिला जातो. प्रायमरी युझरसाठी ६० जीबी डेटा आणि प्रत्येक सेकंडरी युझरला ३० जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्लानमध्ये डेटा रोलओवर केला जातो. अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि प्रत्येक कनेक्शनच्या युझरला प्रतिमहिना १०० एसएमएस ऑफर केले जातात.
Vi चा ६४९ रुपयांचा प्लान
Vi च्या या प्लानमध्ये युझर्सना दोन कनेक्शन ऑफर केली जातात. यामध्ये एक प्रायमरी आणि एक सेकंडरी कनेक्शनचा समावेश आहे. या प्लानमध्ये एकूण ८० जीबी डेटा दिला जातो. प्रायमरी युझरला ५० जीबी आणि सेकंडरी युझरला ३० जीबी डेटा ऑफर केला जातो. प्रायमरी युझर २०० जीबीपर्यंत, तर सेकंडरी युझर ५० जीबीपर्यंत डेटा कॅरी फॉरवर्ड करू शकतात. डेटाशिवाय अन्य बेनिफिट्समध्ये दोन्ही कनेक्शन युझर्सला अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि प्रतिमहिना १०० एसएमएस ऑफर केले जातात.