शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

Vi Network: व्होडाफोन-आयडियाचे नोव्हेंबरपासून नेटवर्क बंद होणार? 25.5 कोटी ग्राहक संकटात, 5G देखील लांबणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 11:24 AM

VI Network Shut Down: रिलायन्स जिओ, एअरटेलनंतर देशातील तिसरी टेलिकॉम कंपनी ही व्होडाफोन आयडियाच आहे. परंतू, दोन्ही कंपन्या एकत्र आल्या तरी देखील या कंपन्यांवरचे आर्थिक संकट काही टळलेले नाही.

गेल्या काही वर्षांपासून फायद्यातील व्यवसायासाठी झगडत असलेली व्होडाफोनआयडिया कंपनी २५.५ कोटी ग्राहकांच्या अडचणी वाढविण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरपासून कंपनीचे नेटवर्क बंद होऊ शकते. व्हीआयवर इंडस टॉवर्सचे जवळपास ७००० कोटींचे कर्ज थकीत आहे. जर कंपनीने तातडीने हे पैसे भरले नाहीत, तर व्हीआयला नोव्हेंबरपासून टॉवर्सचा अॅक्सेस देण्यात येणार नाही, असा इशारा इंडसने दिला आहे. असे झाले तर ग्राहकांना नेटवर्क मिळणार नाही. 

इंडस टॉवर्स ही एक टॉवर कंपनी आहे, जी देशभरात टॉवरसाठी जागा भाड्याने घेऊन त्यावर टॉवर उभारून ते टेलिक़ॉम कंपन्यांना भाड्याने देते. या कंपनीने व्हीआयला सोमवारी पत्र लिहून हा इशारा दिला आहे, असे ईटीने सूत्रांच्या हवाल्याने आपल्या वृत्तात म्हटले आहे. सोमवारीच इंडस टॉवर्सच्या बोर्डाची बैठक झाली. 

रिलायन्स जिओ, एअरटेलनंतर देशातील तिसरी टेलिकॉम कंपनी ही व्होडाफोनआयडियाच आहे. परंतू, दोन्ही कंपन्या एकत्र आल्या तरी देखील या कंपन्यांवरचे आर्थिक संकट काही टळलेले नाही. या कंपनीवर मोठे कर्ज आहे. एअरटेल, जिओ दिवाळीतच ५जी नेटवर्क लाँच करणार आहेत. परंतू, व्होडाफोनने गेल्या महिन्यात फक्त हिंट दिली होती, त्यापुढे काहीही घोषणा केलेली नाही. आधीचेच देणे असल्याने व्होडाफोनला ५जी साठी टॉवर घेण्यास समस्या येत आहेत. ५जी इक्विपमेंट सप्लाय करणाऱ्या कंपन्या आणि टॉवर कंपन्यांसोबत डील पक्की करण्यात समस्या येत आहेत. या कंपन्या व्हीआयकडे आधीची थकित रक्कम आणि अॅडव्हान्स पेमेंट मागत आहेत. आधीच कर्जाच्या ओझ्यात असलेल्या कंपनीला हे शक्य नाहीय. व्हीआयवर १३ हजार कोटींचे कर्ज थकीत आहे. त्यातच नोकियाचे ३००० कोटी रुपये आणि स्वीडनच्या एरिक्सन कंपनीचे १००० कोटू रुपये देणे आहे. 

Vodafone Idea ही UK स्थित कंपनी Vodafone Group Plc. आणि आदित्य बिर्ला ग्रुप (ABG) यांची एकत्र केलेली कंपनी आहे. पूर्वी या दोन्ही वेगवेगळ्या कंपन्या होत्या. काही वर्षांपूर्वीच या कंपन्या एकत्र आल्या. ही कंपनी इंडस टॉवर्सचे 7,000 कोटी रुपये आणि अमेरिकन टॉवर कंपनी (ATC) 2,000 कोटी रुपये देणे आहे. कंपनी कर्ज आणि इक्विटीच्या माध्यमातून 20 हजार कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करत आहे परंतु अद्यापपर्यंत ती कोणतीही डील करू शकलेली नाही.

टॅग्स :Vodafoneव्होडाफोनIdeaआयडिया