नवी दिल्ली : टेलिकॉम क्षेत्रातील व्होडाफोनआयडिया कंपनी आता VI नावाने ओळखली जाणार आहे. कंपनीने एका आयोजित कार्यक्रमात नवीन ब्रॅण्ड आणि लोगो लाँच केला आहे.
व्होडाफोन आणि आयडिया कंपन्यांचे विलीनीकरण झाल्यानंतरही कंपन्या आपल्याच नावाने काम करत होत्या. त्यानंतर आता दोन्ही कंपन्यांची नावे एकत्र करुन VI नावाचा ब्रॅण्ड लाँच केला आहे. V म्हणजे Vodafone आणि I म्हणजे Idea. त्यामुळे आता यामध्ये बदल दिसून येणार आहे.
व्होडाफोन इंडिया लिमिटेड आता VI झाली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, VI फ्युचर तयार आहे आणि या एका ब्रॅण्डच्या नावाखाली दोन्ही कंपनी व्यवसाय करतील. तसेच, ४ जी सोबत कंपनीजवळ ५ जी संदर्भात टेक्नॉलॉजी सुद्धा तयार करण्याचे कंपनीने म्हटले आहे. विलीनीकरणानंतर देशभरात ४ जी कव्हरेज दुप्पट झाल्याचा दावाही कंपनीने केला आहे. कंपनीने यावेळी नवीन प्लॅनची घोषणा केलेली नाही.
कंपनीने VI ब्रॅण्डअंतर्गत नवीन वेबसाइटही बाजारात आणली असून सरप्राइज ऑफर जाहीर केली. नवीन वेबसाइट www.myvi.in असेल. मात्र, जुनी वेबसाइटवर देखील काम सुरुच असणार आहे.
दोन वर्षांपूर्वी व्होडाफोन आणि आयडियाचे विलीनीकरण झाले होते. तेव्हापासून, दोन्ही मोठ्या नेटवर्कला एकत्रित करण्याचे काम चालू होते आणि आता ते VI ब्रँड नावाने सादर केले जात आहे, असे कंपनीचे कार्यकारी अधिकारी रविंद्र टक्कर यांनी यांनी सांगितले.
MyVodafone अॅप झाले VI अॅप...गुगल स्टोअर आणि अॅपल प्ले स्टोअरवरील MyVodafone अॅपचे नाव बदलले आहे. आता Vi App अशा नावाने आहे. जर तुम्ही व्होडाफोन युजर्स आहात, तर अॅप अपडेट करू शकता. हॅपी सरप्राइजच्या माध्यमातून या अॅपमध्ये प्राइज जिंकू शकता.
आणखी बातम्या...
- "माझी ताकद काय आहे, ते १०५ आमदार असूनही विरोधी पक्षात बसलेल्यांना विचारा!"
- दाऊदचा हस्तक बोलतोय, उद्धव ठाकरेंशी बोलायचंय; 'मातोश्री'वर दुबईहून फोन
- दिपेश सावंतच्या अटकेप्रकरणी 'एनसीबी' अडचणीत, कोर्टाने मागितले उत्तर
- सहा सरकारी बँकाच्या खासगीकरणावर भाजपाचा डोळा, राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप
- राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करा अन् शरद पवारांना अध्यक्ष बनवा; रामदास आठवलेंची सूचना
- 'ना भूले हैं, ना भूलने देंगे'; सुशांतच्या मृत्यूवरून राजकारण, भाजपाने छापले स्टिकर्स
- "२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार", सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला
- मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान