Vi (वोडाफोन आयडिया) आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. यासाठी कंपनी अनेक नवीन प्लॅन्स सादर करत आहे तसेच जुन्या प्लॅन्समध्ये बदल करत आहे. आता कंपनीने आपल्या लोकप्रिय प्री-पेड प्लॅनमध्ये मोठा बदल केला आहे. Vi ने आपला 449 रुपयांच्या प्री-पेड रिचार्ज प्लॅन वेबसाईटवर डबल डेटा ऑफरसह लिस्ट केला आहे. 2GB डेली डेटासह सादर झालेल्या या प्लॅनमध्ये आता 4GB डेली डेटा मिळत आहे.
Vi चा 449 रुपयांचा प्लॅन
449 रुपयांच्या वोडाफोन आयडियाच्या या प्लॅनमध्ये आता रोज 4GB हायस्पीड डेटा मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट्स देखील मिळतात. तसेच यात Zee5 प्रीमियमचे सब्स्क्रिप्शन मोफत मिळते. या मोफत सब्स्क्रिप्शनची वैधता एक वर्षाची आहे. या प्लॅनचा समावेश फ्री नाईट-डेटा ऑफर अंतर्गत करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहक रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मोफत डेटाचा लाभ घेऊ शकतात. 449 रुपयांच्या या प्लॅनमध्ये Vi ऍप्सचे मोफत सब्स्क्रिप्शन देखील मिळते. 56 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये रोज 100 SMS देखील मोफत मिळतात.
100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या रिचार्ज प्लॅनमधील मोफत एसएमएस बंद
प्रत्येक युजर मागील सरासरी उत्पन्न (ARPU) वाढवण्यासाठी कंपन्यांनी 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या रिचार्ज प्लॅनमधील मोफत एसएमएस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा आहे. ज्या लोकांना मोफत एसएमएस बेनिफिट्स हवे असतील असे ग्राहक 100 पेक्षा जास्त किंमतीचे रिचार्ज पॅक वापरतील आणि कंपन्यांचे उत्पन्न वाढेल. टेलीकॉम कंपन्यांच्या या निर्णयानंतर एंट्री लेव्हल पॅक वापरणाऱ्या ग्राहकांना धक्का बसला आहे. मोफत एसएमएस न मिळाल्यामुळे युपीआय व्हेरिफिकेशन, मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी अश्या अनेक सुविधांच्या फक्त एका मेसेजसाठी ग्राहकांना जास्त खर्च करावा लागले.