शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

व्होडाफोन रेडने लाँच केले नवीन प्लॅन, 499 रुपयांपासून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2017 9:30 PM

आपल्या ग्राहकांना अगदी स्वस्तात इंटरनेट डेटा प्लॅन देण्यावरुन भारतीय मोबाईल कंपन्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे. रिलायन्स जिओ आणि एयरटेलने मार्केटमध्ये नवीन डेटा प्लॅन आणल्यानंतर आता व्होडाफोनने सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे.

ठळक मुद्दे व्होडाफोन रेड पोस्टपेड ग्राहकांसाठी तीन आकर्षक प्लॅनरेड ट्रॅव्हलर, रेड इंटरनॅशनल आणि रेड सिग्नेचरआठ नोव्हेंबर हा प्लॅन मार्केटमध्ये

नवी दिल्ली : आपल्या ग्राहकांना अगदी स्वस्तात इंटरनेट डेटा प्लॅन देण्यावरुन भारतीय मोबाईल कंपन्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे. रिलायन्स जिओ आणि एयरटेलने मार्केटमध्ये नवीन डेटा प्लॅन आणल्यानंतर आता व्होडाफोनने सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. व्होडाफोन कंपनीने आपल्या व्होडाफोन रेड पोस्टपेड ग्राहकांसाठी तीन आकर्षक प्लॅन आणले आहेत. यामध्ये रेड ट्रॅव्हलर, रेड इंटरनॅशनल आणि रेड सिग्नेचर असे प्लॅन आहेत. व्होडाफोन रेडचे मासिक प्लॅन 499 रुपये आणि 699 रुपयांपासून 2,999 रुपयांपर्यंत आहेत.व्होडाफोन रेड ट्रॅव्हलरच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना देशभरात रोमिंग आणि कॉलिंगसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच, रेड ग्राहकांना 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 20 जीबी इंटरनेट डेटा, 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये 35 जीबी इंटरनेट डेटा आणि 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 50 जीबी इंटरनेट डेटा देण्यात येणार आहे. तसेच, जर काही कारणामुळे तुमच्याकडून महिन्याला डेटा वापरला गेला नाही, तर तो पुढील महिन्यात आपोआप जमा होणार आहे. याशिवाय दर महिन्याला 100 एसएमएस सुद्धा विनाशुल्क पाठविता येणार आहेत.रेड इंटरनॅशनल प्लॅनमधून ग्राहकांना अमेरिका, कॅनडा, चीन, हाँगकाँग, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूरसाठी विनाशुल्क आयएसडी मिनिटांचा फायदा घेता येणार आहे. यामध्ये 1299 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100 आयएसडी मिनिट्स आणि 75 जीबी इंटरनेट डेटा, 1699 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100 आयएसडी मिनिट्स आणि 100 जीबी इंटरनेट डेटा, 1999 रुपयांच्या 200 आयएसडी मिनिट्स आणि 175 जीबी इंटरनेट डेटा दिला जाणार आहे.याचबरोबर, 2999 रुपयांच्या रेड सिग्नेचर प्लॅनच्या माध्यमातून 200 आयएसडी मिनिट्स आणि 200 जीबी इंटरनेट डेटा उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही प्लॅनमध्ये रेड टुगेदरचा ऑप्शन निवडून तुमच्या मित्रांना किंवा परिवाराला जोडले की, तुमच्या बिलामध्ये 20 टक्कांची सूट दिली जाणार आहे. याशिवाय तिन्ही नवीन प्लॅनमधून 12 महिन्यांसाठी विनाशुल्क नेटफ्लिक्स सेवा, यांसारख्या अनेक सुविधा मिळणार आहेत. दरम्यान, कंपनीकडून असे जाहीर करण्यात आले आहे की, आठ नोव्हेंबर हा प्लॅन मार्केटमध्ये आणला जाणार असून भारतातील आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमधील मोबाईल सर्कलमध्ये उपलब्ध नाही आहे. 

टॅग्स :Vodafoneव्होडाफोन