शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

नेटवर लपूनछपून काय पाहता याची माहिती सरकारला हवीय? भारतातील VPN वापरण्याच्या नियमांत मोठा बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 11:38 IST

New VPN Rules In India: Virtual Private Network च्या नियमांत मोठे बदल करण्यात आले आहेत. आता वीपीएन सर्विस प्रोव्हायडर कंपन्यांना युजर्सचा डेटा साठवून ठेवावा लागेल.  

भारत सरकारने नवीन आयटी पॉलिसी सादर केली आहे. या पॉलिसीमध्ये VPN सर्व्हिस वापरण्याच्या नियमांत मोठे बदल केले आहेत. या नियमांबाबत युजर्स आणि विपीएन सर्व्हिस प्रोव्हायडर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण जी सर्व्हिस ओळख ऑनलाईन लपवण्यासाठी वापली जाते तीच आता तुमचा डेटा साठवून ठेवणार आहे. ही पॉलिसी यावर्षी जूनच्या अखेरपासून लागू होणार आहे.  

भारत सरकारने VPN सर्विस प्रोव्हायडर्सना आता युजर्सचा डेटा जमा करावा लागेल. युजर्सचा जमा केलेला डेटा पाच वर्षांपर्यंत साठवून ठेवावा लागेल, तसेच ग्राहकांनी अकाऊंट डिलीट केल्यानंतर देखील हा डेटा कंपन्यांकडे सुरक्षित ठेवावा लागेल. VPN सर्विस प्रोव्हायडर्सना CERT-in (Computer Emergency Response Team) नं नवीन आयटी पॉलिसी अंतर्गत निर्देश जारी केले आहेत. ही पॉलिसी जून 2022 च्या अखेरपर्यंत लागू करण्यात येईल.  

कोणता डेटा मागत आहे सरकार?  

विपीएन वापरणाऱ्या युजर्सचं नाव, IP अ‍ॅड्रेस, यूजेज पॅटर्न आणि ओळख पटवणारी इतर माहिती देखील साठवून ठेवावी लागेल. हे विपीएन सर्व्हिसच्या अगदी विरुद्ध आहे. या सर्व्हिसचा वापर ऑनलाईन ओळख लपवण्यासाठी केला जातो. VPN नो-लॉगिंग पॉलिसीवर चालतो. कंपन्या फक्त RAM डिस्क सर्वर आणि अन्य लॉग-लेस टेक्नॉलॉजीवर चालतात. त्यामुळे त्यांना डेटा आणि वापराची माहिती मॉनिटर करता येत नाही.  

का घेतला गेला निर्णय?  

अलीकडे भारतात ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटीज बद्दल कडक पाऊल उचलली जात आहेत. म्हणून वीपीएनच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. VPN च्या मदतीने युजर्स आपली ब्राउजिंग हिस्ट्री, डिवाइसची माहिती, आयपी अ‍ॅड्रेस आणि लोकेशन लपवून ठेवू शकतात. त्यामुळे सायबर गुन्हे देखील वाढत आहेत. आता कंपन्यांना सर्व युजर्सचा डेटा कमीत कमी 5 वर्ष साठवून ठेवावा लागेल. असं न केल्यास एक वर्षापर्यंतचा कारावास होऊ शकतो.  

विपीएन सर्व्हिस प्रोव्हायडर्सची प्रतिक्रिया 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Surfshark, Proton VPN आणि Express VPN यांनी हे नियम मान्य करण्यास नकार दिला आहे. “भारत सरकारचे विपीएन कंपन्यांकडून युजरचा खाजगी डेटा मागण्याचे नवीन नियम काळजी वाढवणारे आहेत. हे नागरिकांच्या डिजिटल हक्कांचे उल्लंघन आहे,” असं एक्सप्रेस विपीएनचे व्हाईस प्रेजिडेन्ट हॅरोल्ड ली म्हटले आहेत.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान