गुगलने आज Android Q ची घोषणा केली. या सिस्टिममध्ये अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. मात्र, ही ऑपरेटिंग सिस्टिम सुरुवातीला केवळ गुगलच्याच फोनवर वापरायला मिळणार होती. गुगलने पुढे जात अन्य 15 मोबाईलवर या Android Q चे बीटा व्हर्जन वापरायला दिले आहे. पाहा कोणते मोबाईल आहेत.
Google I/O मध्ये कंपनीने Android Q च्या तिसऱ्या बीटा व्हर्जनची घोषणा केली. हे फर्मवेअर OnePlus 6T, Essential Phone, Asus Zenfone 5Z सह अन्य फोनमध्ये डाऊनलोड करता येणार आहे.
हे फोन आहेत लिस्टमध्ये...-Asus Zenfone 5z-Essential Phone-Huawei Mate 20 Pro-LG G8-Nokia 8.1-OnePlus 6T-Oppo Reno-Realme 3 Pro-Sony Xperia XZ3-Tecno Spark 3 Pro-Vivo X27-Vivo NEX S-Vivo NEX A-Xiaomi Mi 9-Xiaomi Mi MIX 3 5G-Google Pixel 3-Google Pixel 3 XL-Google Pixel 2-Google Pixel 2 XL-Google Pixel-Google Pixel XL
कसे डाऊनलोड कराल...वर नोंद केलेल्या डिव्हाईसवर Android Q बीटा व्हर्जन डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला android.com/beta वर जाऊन फर्मवेअर पाहावे लागेल. Google Pixel स्मार्टफोन वापरणारे सरळ गुगलकडून ही अपडेट मिळवू शकतात. यासाठी त्यांना पिक्सलचे डिव्हाईस Android बीटा प्रोग्रॅमसाठी नोंद करावे लागणार आहे. गुगलने सांगितले की त्यांची ऑपरेटिंग सिस्टिम सध्या 2.5 अब्ज मोबाईलवर वापरली जाते. नवीन Android Q यंदा अनेक फोल्डेबल फोनवरही येणार आहे.