अनेकदा आपल्याला मित्राचं किंवा गर्लफ्रेंडचं लोकेशन माहिती हवं असे वाटते. परंतु याबाबत सहजासहजी माहिती मिळत नाही. परंतु अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत ज्यामुळे तुम्ही मित्रांचे लाईव्ह लोकेशन जाणून घेऊ शकता. चांगली बाब म्हणजे हे पॉप्युलर फिचर टेक कंपनी Google कडून उपलब्ध करून दिले आहे.
मित्रांचे लाईव्ह लोकेशन पाहण्यासाठी त्याचा फोनचा मोबाईल डेटा किंवा वायफाय सुरू असणं गरजेचे आहे. त्याशिवाय जीपीएस ऑनही असायला हवं अन्यथा तुम्हाला लाईव्ह लोकेशन दिसणार नाही. हा, पण तुम्ही त्यांच्या परवानगीशिवाय असं करू नका. विना परवानगी जर तुम्ही असे केले तर त्यामुळे तुम्ही अडचणीत अडकू शकता.
Google Map अथवा WhatsApp चा वापर करून तुम्ही लाईव्ह लोकेशन शेअरिंग करू शकता. सुरक्षेच्या कारणास्तव याचा वापर केला जाऊ शकतो. सर्वात आधी तुम्ही त्या मित्राशी किंवा गर्लफ्रेंडसोबत बोला ज्याचं लाईव्ह लोकेशन तुम्हाला हवं आहे. Google Maps द्वारे लोकेशन शेअरिंग करण्यासाठी तुमच्या मित्राचा अॅप ओपन करावं लागेल आणि लोकेशन शेअरिंग पर्यायावर जावे लागेल. यानंतर तो तुमच्या ईमेल किंवा मेसेजद्वारे त्याचे लोकेशन शेअर करू शकतो.
व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनही लाईव्ह लोकेशन शेअर करता येऊ शकते. यासाठी तुमच्या मित्राला तुमच्यासोबत व्हॉट्सअॅप चॅट बॉक्स उघडावा लागेल. यानंतर, फोटो, व्हिडिओ आणि इतर अनेक गोष्टी शेअर करण्याचा पर्याय असेल. यातून लोकेशनचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर, लाइव्ह लोकेशन निवडून, तो त्याचे लाईव्ह लोकेशन तुमच्यासोबत शेअर करू शकतो. त्यासाठी एक वेळ मर्यादाही सिलेक्ट करावी लागेल. यानंतर, तुम्हाला तुमच्या फोनवर मित्राचे लाईव्ह लोकेशन दिसेल. तथापि, अनेकांना या फीचरबद्दल आधीच माहिती असेल, परंतु मित्राच्या परवानगीशिवाय असे करणे गुन्हा आहे, यामुळे, लोकेशन शेअर करण्यापूर्वी मित्राने हे सांगणे आवश्यक आहे.