मुंबई - तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग डोळे दिपविणारा आहे. आज वापरात असलेले तंत्रज्ञान काही महिन्यांत कालबाह्य होते. पूर्वी हा वेग ऐवढा गतीमान नव्हता. म्हणूनच कॅसेटस्, व्हीसीआर-व्हीसीपी, टेप-रेकॉर्डर, वॉकमॅन, फ्लॉपी, सीडी इत्यादी वस्तू बऱ्याच काळापर्यंत वापरात राहिल्या. घरात खणखणाऱ्या फोनने तर कमालीची कात टाकली. ‘फोन’, कॅमेरा, रेकॉर्डर, अलार्म क्लॉक, आशा अनेक अॅप्लिकेशन्स आणि सोयींनीयुक्त असा हा स्मार्टफोन केवळ फोन न राहता एक अत्यावश्यक मदतनीस झाला. एखाद्याशी आपण मराठी बोलत असताना आपल्याला मराठीमध्ये टाईप करावस वाटते पण ते शक्य होतं नाही. पण अँड्रॉइड मोबाइल वर मराठी मध्ये लिहिण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गूगल इंडिक कीबोर्ड नावाचं अॅप्लिकेशन जे तुम्ही मराठी शब्दाच इंग्लिश टायपिंगसुद्धा मराठीत लिहीतं......
जसे की ह्यामध्ये जर तुम्ही "solapur" अस लिहिलं तर तुम्हाला "सोलापूर" असं दिसेल अथवा टाइप होईल. आता याला नवं मटेरियल डिजाइन सुद्धा आहे. वापरुन पहा. नक्की आवडेल.
- मोफत डाऊनलोड करण्यासाठी ह्या लिंकवर जा → Google Indic Keyboard App
- प्रथम प्ले स्टोरवरून App इंस्टॉल करा
- नंतर Settings > Language & Input >“KEYBOARD & INPUT METHODS”
- ह्यामध्ये Google Indic ला टिक करा आणि Default “Choose input method” मध्ये “Marathi & English” निवडा.
- हिन्दी/मराठी आणि इंग्लिश यामध्ये भाषा तिथेच बदलण्यासाठी “ळ” आणि "abc" अशा दिसणार्या बटनचा वापर करा.
- आणि आता टाइप करा मराठीत अगदी कोणत्याही App मध्ये उदा. WhatsApp, Hike, Messenger