नवी दिल्ली - सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्ट होता येतं. अनेक गोष्टी शेअर करता येतात. मात्र अनेकदा फेक मेसेजमुळे काही अडचणींचा देखील सामना करावा लागतो. सातत्याने विविध गोष्टी या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक मेसेज व्हॉट्सअॅपवर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये जर तुम्ही व्हॉट्सअॅपवर एखादा व्हिडीओ पाहिलात तर फक्त 10 सेकंदात तुमचा अँड्रॉईड फोन किंवा आयफोन हॅक होऊ शकतो असं म्हटलं आहे.
फोनला हॅक करणाऱ्या व्हिडीओचं नाव 'India is doing it' असं असल्याचं सांगितलं जात आहे. Full Fact ने दिलेल्या माहितीनुसार, या मेसेजमध्ये व्हॉट्सअॅपवर एक व्हिडीओ शेअर केला जात आहे. 'India is doing it' असं या फाईलचं नाव आहे. ही फाईल ओपन करू नका. कारण फक्त 10 सेकंदात ती फोन हॅक करते असं म्हटलं आहे. 'अलर्ट, आपले मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांपर्यंत हा मेसेज पोहोचवा' असं या व्हायरल मेसेजच्या शेवटी म्हटलं आहे.
फॅक्ट चेकिंग सर्व्हिस बुमने दिलेल्या माहितीनुसार, हा मेसेज पूर्णपणे फेक आहे. असाच एक मेसेज 2020 च्या सुरुवातीला व्हायरल झाला होता. व्हिडीओच्या मदतीने हॅकिंग केलं जात असल्याचा अद्याप कोणताही पुरावा नसल्याचं देखील म्हटलं आहे. व्हॉट्सअॅपवर अशा फेक मेसेजचा उद्देश हा तो मेसेज जास्तीत जास्त फॉरवर्ड करावा असा असतो. त्यामुळे अफवा परवणारे मेसेज इतरांना पाठवू नका तसेच त्यावर पटकन विश्वास ठेवू नका. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
WhatsApp वेबवरून काम करणं सोपं होणार; व्हॉईस, व्हिडीओ कॉलिंगची मजा घेता येणार
व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. व्हॉट्सअॅप देखील नवनवीन फीचर्स आणून युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर करत असतं. मात्र आता व्हॉट्सअॅप वेब वापरताना देखील चॅटिंगची मजा आणखी वाढणार आहे. लवकरच व्हॉट्सअॅप युजर्संना वेब व्हर्जनवर व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर मिळण्याची शक्यताआहे. एका नव्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप आपल्या वेब व्हर्जनवर व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग आणण्यासाठी काम करत आहे.