मुंबई: व्हॉट्सअॅप हे सोशल मीडियावर प्रभावी माध्यम ठरत आहे. बऱ्याचदा व्हॉट्सअॅपच्याच माध्यमातून अनेक कामं केली जातात. तसेच सकाळी उठल्या उठल्या अनेकांना पहिल्यांदा व्हॉट्सअॅप पाहण्याची सवयच झाली आहे. वापरकर्त्यांमध्ये व्हॉट्सअॅपचीही प्रचंड क्रेझ आहे. त्यानुसार व्हॉट्सअॅपही स्वतःला अद्ययावत करत असते. व्हॉट्सअॅपने 2015मध्ये कॉम्प्युटरद्वारे वापरता येईल, असे व्हॉट्सअॅप वेब व्हर्जन लॉन्च केले होते. परंतु त्याचा वापर करताना फोनमध्ये इंटरनेट असावे लागते. आपला फोन इंटरनेटला कनेक्ट नसेल तर आपण वेबवर व्हॉट्सअॅप वापरू शकत नाही. मात्र हे चित्र आता लवकरच बदलणार आहे.
WebBetaInfoने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी आता युनिव्हर्सल विंडोज प्लॅटफॅार्म UWP अॅपवर काम करत आहे. त्याचप्रमाणे असे मल्टी प्लॅटफॉर्म सिस्टम सादर केले जाणार आहे, ज्यामार्फत फोनमध्ये इंटरनेट नसले तरी तुम्हाला वेबवर व्हॅाट्सअॅप हाताळता येणार आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून यूजर्सला आपल्या एकाच अकाउंटला अनेक डिवाइसमध्ये वापरता येणार असल्याचे WebBetaInfo कंपनीने सांगितले.
WhatsApp UWP APP आल्यावर काय काय करता येईल हे जाणून घ्या:
- यूजर्सच्या व्हॅाट्सअॅपचे मेन अकाउंट ipad वर iPhone वरून Uninstall न करता वापरता येऊ शकतं.
- Android आणि iOS डिव्हाइसवर दोन्ही अकाउंट वापरता येतील.
- फोनमध्ये इंटरनेट नसल्यास देखील वेबवर व्हॅाट्सअॅप UWP APP वापरता येईल.
WebBetaInfo असेही म्हटले आहे की जर यूजर्स बॅटरी खर्च करण्याच्या भीतीने इंटरनेटचा वापर करत नसतील तर कॉम्प्युटर किंवा UWP वेबवर यूजर्स व्हॅाट्सअॅप वापरता येऊ शकतं.