- दीपक होमकर पुणे : पूर्वी लॅण्डलाईनवर येणारे कॉल्स कोणाचे हे कळत नसायचे त्यामुळे लॅण्डलाईनला कॉलरआडी डिस्ल्पे स्क्रिन आली, पुढे मोबाईल आला आणि त्यावरही ही सुविधा उपलब्ध असल्याने आपल्याला कोणाचा कॉल आला ते सहजपणे कळत होतं. पुढे अँड्रॉईड टेक्नॉलॉजी आली आणि मोबाईलचं जग बदलून गेलं. मोबाईलवर काहीही (हवं ते आणि नको ते) करण्यासाठी हजारो ॲप्सची निर्मिती झाली. आपल्याकडे सेव्ह नसलेला नंबर (अननोन नंबर्स) कोणाचा हे कळण्यासाठी शेकडो ॲप्स उपलब्ध आहेत. त्यामध्ये truecaller हे ॲप लोकप्रिय झाले; मात्र त्यावरही उपाय शोधत युजर्सनी फेक नाव सेव्ह केल्याने truecaller वर चुकीची नावे यायला लागली. आता त्याचा पुढे जाऊन आपल्याला हव्या त्या नंबरने किंवा आवाज बदलून कॉल करता येईल असे ॲप्सही शेकडोने विनामूल्य उपलब्ध असून त्याचा गैरवापरही सुरु आहे...असे काम करते ॲपफेक कॉल ॲप फोनमध्ये इन्स्टॉल करताच ट्रू कॉलरमधून कॉलिंगची की उपलब्ध होते. त्यापूर्वी त्यामध्ये कॉल करणाऱ्याचा कॉलर आयडी जो हवा तो (नंबर-नाव) ॲप वापरकर्त्याला सेव्ह करावे लागते. अनेक ॲप्सवर तर कॉल करणाऱ्याचा आवाज बदलता येतो. कुठे मिळतात फेक ॲप्सगुगलवर फेक कॉलर आयडी असं सर्च केले की शेकडो ॲप्स दिसायला लागतात. प्लेस स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर असे ॲप्स दिसणार नाहीत. कारण या कंपन्यांकडून फेक गोष्टींचे समर्थन केले जात नाही. मात्र गुगलवर ॲप्सचा शोध घेतला तर शेकडो ॲप्सची यादीच समोर येते. स्पुफिंगचे प्रकार वाढलेकॉल स्पुफिंगचा म्हणजे एखाद्याला फोन करून मी अमूक मंत्र्याच्या, अधिकाऱ्याच्या किंवा सेलिब्रेटीच्या घरातून, ऑफिसमधून बोलतो असे सांगून खंडणी मागितली जाते, किंवा धमकी दिली जाते. त्यासाठी संबंधित मंत्री, अधिकारी, सेलिब्रेटी यांचा पर्सनल, ऑफिशिअल नंबर माहिती करतात.यातून वाचाल कसे फेक कॉलर ॲप्सपासून वाचण्यासाठी अद्याप तरी ॲन्टी व्हायरस सॉफ्टवेअर उपलब्ध नाहीत. त्यामुळे अशा कॉल्सना ब्लॉक करण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे असे कॉल्स आल्यानंतर चौकस बुद्धी ठेवून कोणाकडून नेमका फोन आला होता त्याची दुसऱ्या नंबरवरून उलट तपासणी करणे महत्त्वाचे ठरते.
भाई, फेक काॅल आल्यावर करायचे काय ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 5:59 AM