Apple iPhone चा समावेश जगभरातील टॉप स्मार्टफोन्समध्ये होतो. भारतातील अनेकजण आयफोन घेण्याचं स्वप्न बघतात. आयफोन युजर्स देखील ब्रँड आणि स्टेट्स सिम्बल व्यतिरिक्त यातील डिजाईन, सॉफ्टवेयर एक्सपीरियन्स, इकोसिस्टमसह चांगल्या फीचर्सचं कौतुक करतात. आयफोनमध्ये काही फीचर्स फोनची किंमत योग्य ठरवतात. आज आपण अशाच एका फिचरची माहिती घेणार आहोत.
तुम्ही कधीतरी आयफोनच्या काही मॉडेल्सच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये एक ब्लॅक डॉट बघितला असेल. यात कॅमेरा सेन्सरची खोली दिसत नाही किंवा फ्लॅशचा सफेद रंग यात नाही. मग फक्त डाग किंवा स्टिकर प्रमाणे दिसणारा हा ब्लॅक डॉट करतो तरी काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. अगदी साधा दिसणारा हा ब्लॅक डॉट खूप खास आहे आणि भन्नाट फीचर यामुळे आयफोनमध्ये मिळतं.
आयफोनमधील ब्लॅक डॉटचा उपयोग
आयफोन कॅमेरा सेटअपमध्ये असणारा ब्लॅक डॉट देखील एक कॅमेरा सेन्सर आहे. अगदीच स्पष्ट सांगायचं झालं तर हा एलआयडीएआर स्कॅनर आहे. हा सेन्सर इंफ्रारेड लाईट प्रक्षेपित करून 3D पिक्चर्स तयार करू शकतो. यासाठी तुम्हाला 3D स्कॅनर अॅपचा वापर करावा लागेल जो आयफोनमध्ये मिळतो.
या स्कॅनर अॅपचा वापर करून तुम्ही कोणतीही वस्तू, चेहरा, खोली इत्यादी देखील स्कॅन करू शकता. त्यांची मापं नोंदवू शकता आणि 3D फाईलमध्ये रूपांतरित करू शकता. विशेष म्हणजे या फाईल्स शेयर देखील करता येतात. या 3D स्कॅनरचा व्यावसायिक वापर देखील करता येऊ शकतो.
हे देखील वाचा: