नवी दिल्ली : भारतात 2020 मध्ये 749 मिलियनहून अधिक इंटरनेट युजर्स होते, तर 2040 पर्यंत ही संख्या 1.5 बिलियनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. बहुतेक युजर्स आपल्या मोबाइल गॅझेटद्वारे इंटरनेटचा वापर करत आहेत, असा स्टॅटिस्टा विश्लेषण अहवालात दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, इंटरनेटचा वापर करणाऱ्या महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत खूपच कमी आहे. ग्रामीण भारतातील महिला इंटरनेट युजर्सची संख्या आणखी कमी आहे. पण चांगली बातमी अशी आहे की, आर्थिक वर्ष 2021 च्या चौथ्या तिमाहीत महिला युजर्सच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.
एका रिपोर्टनुसार, आर्थिक वर्ष 2011 च्या चौथ्या तिमाहीत एकूण 825 मिलियन युजर्सपैकी जवळपास 43-45 टक्के महिला होत्या. दरम्यान, महिला इंटरनेट युजर्सच्या सर्च हिस्ट्रीमध्ये काय असू शकते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तर अलीकडील रिपोर्टनुसार, 75 टक्के महिला 15-34 वयोगटात येतात. 31 टक्के टीनेजर्स फिट राहण्यासाठी डाइट आणि इतर गोष्टी सर्च करतात. तर 17 टक्के सेक्स, डिप्रेशन आणि ड्रग्सशी संबंधित विषयांवर सर्च करतात.
याशिवाय, महिलांनी सर्वाधिक सर्च केलेल्या रिझल्टपैकी एक म्हणजे रिलेशनशिप. सर्वेक्षणानुसार, त्यापैकी बहुतेक महिला नातेसंबंधांशी संबंधित गोष्टी शोधतात. ब्रेकअप झाल्यानंतर त्याचा सामना कसा करावा, याबद्दल त्या सल्ला शोधतात. तसेच, महिला युजर्स करिअरशी संबंधित कंटेंट देखील सर्च करतात. करिअर आणि शाळा याविषयी माहिती मिळविण्याची महिला पुरुषांपेक्षा अधिक शक्यता असते.
काही मुख्यतः हाय एज्युकेशन कोर्स आणि इन्स्टिट्युशन सर्च करतात, जिथे त्यांना स्टडी करता येईल. याचबरोबर, महिला इंटरनेट युजर्सच्या सर्चमध्ये सर्वात टॉपची गोष्ट म्हणजे फॅशन आणि सौंदर्य. मुलींना फॅशनमध्ये मुलांपेक्षा तिप्पट जास्त रस असतो, हे आश्चर्य वाटायला नको. मुली ऑनलाइन स्टोअरमधून कपडे खरेदी करतात, कारण ते सर्व साइज आणि क्वांटिटीसोबत सहज मिळते.