उन्हाळ्यात एसी सारखा गारवा फॅन्स किंवा कुलर देत नाहीत. त्यामुळे अनेकजण घरात एसी लावून घेतात. परंतु सध्या विजेची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे भारनियमनचं प्रमाण देखील वाढलं आहे. त्यामुळे कितीही भारीतला एसी घेतला तरी विजेविना तो डब्बाच सिद्ध होतो. तुमच्याकडे नियमित वीज असली तरी एसीमुळे वीज बिलात इतकी वाढ होते की तो पाहून घाम फुटू लागतो.
या दोन्ही समस्यांवर एक जबरदस्त उपाय बाजारात उपलब्ध आहे. अनेकांना याची माहिती नसते म्हणून हा या प्रोडक्टचा विचार केला जात नाही. हा उपाय सामान्य एसी पेक्षा थोडा महागडा ठरू शकतो. परंतु तुमचं वीज बिल कमी येईल तसेच पावर कटमध्ये देखील तुम्ही एसीची थंड हवा मिळवू शकाल. आम्ही बोलत आहोत Solar AC अर्थात सौर उर्जेवर चालणाऱ्या एसी बाबत.
Solar AC म्हणजे काय?
सोलर एयर कंडीशनरच्या नावावरून हा एसी कसा चालतो हे तुम्हाला समजलं असेल. हा AC देखील विजेवर चालतो परंतु ही वीज सूर्यप्रकाशापासून मिळवली जाते. यासाठी सोलर पॅनलचा वापर केला जातो, जे सूर्य प्रकाशाचं विजेत रूपांतर करतात आणि एसीला पुरवतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रात्री हा एसी कसा चालेल कारण तेव्हा तर ऊन नसतं.
सोलर एसी तीन माध्यमातून वीज मिळवू शकतो आणि तुम्हाला दिवसा आणि रात्री देखील थंड हवा देऊ शकतो. एक तर थेट सोलर पॅनलमधून येणारी वीज वापरली जाते. दुसरा पर्याय सोलर पॅनलमधून आलेली सोलर पावर बँकमध्ये साठवली जाते आणि गरजेनुसार रात्री वापरली जाते. तसेच या एसीला तुम्ही तुमच्या इलेक्ट्रिसिटी ग्रीडला देखील जोडू शकता.
किंमत
असे अनेक सोलर एसी बाजारात उपलब्ध आहेत, तुम्ही काही वेबसाईट्सवरून देखील यांची खरेदी करू शकता. परंतु तुम्हाला तुमची गरज बघून त्यानुसार एसीचा मॉडेल निवडावा लागेल. सामान्य एसी पेक्षा सोलर एसीची किंमत जास्त असू शकते. परंतु तुमचं वीज बिल कमी होऊ शकतं तसेच पावर कटमध्ये देखील एसीचा आनंद तुम्हाला घेता येईल.