बऱ्याचदा आपल्या आयुष्यातील अनेक छोट्या छोट्या गोष्टींकडे आपलं लक्ष जात नाही. या छोट्या गोष्टी देखील खूप उपयुक्त असतात. खासकारून टेक गॅजेट्सवरील प्रत्येक गोष्ट काही कारणास्तव देण्यात येतात. परंतु आपण कधी त्या फीचर्सचा वापर न केल्यामुळे आपल्याला त्यांची माहिती नसते आणि आपण ती घेत देखील नाही. असंच एक छोटंसं बटन DSLR मध्ये वापरण्यात येणाऱ्या मेमरी कार्डमध्ये दिलं जातं.
मेमरी कार्ड स्मार्टफोनमधील असो किंवा कॅमेऱ्यातील दोन्ही खास डिवाइसेससाठी डिजाइन करण्यात आले आहेत. दोन्हीच्या डिजाईनमध्ये देखील मोठा फरक असतो. मोठ्या कार्डचा वापर कॅमेऱ्यात केला जातो त्याची रचना देखील त्यानुसार बनवली जाते. छोट्या एसडी कार्डपेक्षा याचा आकार तीनपट मोठा असतो.
तसेच्या छोट्या कार्डपेक्षा काही फिचर देखील यात जास्त दिले जातात. ज्यात डावीकडे असलेल्या एका छोट्याश्या बटनचा देखील समावेश आहे. हे बटन वर-खाली करता येतं. हे बटन ऑन ऑफ करून महत्वाचं फिचर अॅक्सेस करता येतं, ज्याची माहिती अनेकांना नसते. जे लोक याचा रोज वापर करतात त्यांना देखील या बटनाचा वापर काय असतो ते माहित नसतं.
जाणून घ्या उपयोग
कॅमेऱ्यात वापरलं जाणारं मेमरी कार्ड लॉक करण्यासाठी या बटनचा वापर केला जातो. याला लॉक मोडवर ठेऊन मेमरी कार्डचा वापर केल्यास कॅमेऱ्यातून फोटो काढता येणार नाही. तसेच यातील फाईल्स देखील कॅमेऱ्यात दिसणार नाहीत. तसेच क्लिक केलेले फोटो आणि व्हिडीओ देखील सेव्ह होणार नाहीत. त्यामुळे या मेमरी कार्डचा वापर करताना मेमरी कार्ड अनलॉक मोडवर आहे का याची खात्री करून घ्यावी नाही तरी तुम्ही क्लिक केलेले फोटो सेव्ह होणार नाहीत आणि मेहनत वाया जाऊ शकते.