तुमच्या घरी देखील टीव्ही असेलच आणि त्यासोबत टीव्हीचा एक रिमोट देखील असेल. जर तुम्ही स्मार्ट टीव्ही वापरत नसाल तर तुमच्याकडे एक छोट्या एलईडी बल्ब सारखा सेन्सर असलेला टीव्ही रिमोट असू शकतो. या सेन्सरचा उपयोग तुम्हाला माहित आहे का? हा सेन्सर चमकताना तुम्ही कधी पाहिलाय का? चला जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरं.
टीव्ही रिमोटमधील सेन्सरला काय म्हणतात
टीव्ही रिमोटमधील हा सेन्सर एक इंफ्रारेड सेन्सर असतो. रिमोटचे इनपुट टीव्ही पर्यंत पोहोचवण्याचं काम हा सेन्सर करतो. या टेक्नॉलॉजीचा वापर एसी, डीटीएच, म्युजिक सिस्टमसह अन्य डिवाइस कंट्रोल करण्यासाठी केला जातो. विशेष म्हणजे शाओमी देखील असा सेन्सर आपल्या स्मार्टफोन्समध्ये देते ज्याच्या मदतीनं तुम्ही तुमच्या घरातील अप्लायन्सेस कंट्रोल करू शकता.
अशी बघा चमक
जेव्हा तुम्ही रिमोटवर एखादं बटन प्रेस करता तेव्हा हा इंफ्रारेड सेन्सर चमकतो. परंतु माणसाचे डोळे हा प्रकाश बघू शकत नाहीत. परंतु तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीनं या इंफ्रारेड सेन्सरची लाईट बघू शकता. यासाठी तुमच्या स्मार्टफोन कॅमेरा ऑन करा आहे त्या कॅमेऱ्यासमोर रिमोट धरून बटन प्रेस करा. म्हणजे तुम्हाला या इंफ्रारेड सेन्सरची लाईट दिसेल. ही ट्रिक वापरून तुम्ही तुमचा रिमोट चालू आहे कि नाही ते देखील चेक करू शकता.
हे देखील वाचा: