शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
4
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
5
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
8
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
9
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
10
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
11
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
12
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
14
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
15
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
16
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
17
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
18
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
19
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
20
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल

Masked Aadhaar Card : पाहा काय असतं मास्क्ड आधार कार्ड; जाणून घ्या कसं कराल डाऊनलोड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 4:50 PM

पाहा काय आहेत मास्क्ड आधार कार्डाचे फायदे आणि कसं डाऊनलोड कराल.

आजकाल प्रत्येक सरकारी कामासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) आवश्यक आहे. आधार कार्डला ओळख पुरावा म्हणून सर्वात जास्त ग्राह्य धरले जाते. बँकेत खाते उघडण्यासाठी किंवा पासपोर्ट काढण्यासाठी, कोणत्याही सरकारी योजनेचा किंवा अन्य कामाचा लाभ घेण्यासाठी फक्त आधार कार्ड आवश्यक आहे.

आधार कार्डवर १२ अंकांचा एक युनिक नंबर आहे. या १२ अंकांमध्ये कार्डधारकाच्या ओळखीची संपूर्ण माहिती नोंदवण्यात येते. आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट असल्यामुळे त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक केला पाहिजे. याचबरोबर, आता मास्क्ड आधार कार्डही आलंय. तुमचे सुरुवातीचे ८ नंबर मास्क्ड आधार कार्डमध्ये लपलेले असतात. सुरूवातीच्या या नंबरवर 'xxxx-xxxx'असे क्रॉस चिन्ह देण्यात येतं. तर उर्वरित शेवटचे ४ नंबर दिसतात.

मास्क्ड आधार कार्डचा फायदा असा आहे की, जरी तुमचे आधार कार्ड हरवले तर त्याचा गैरवापर अज्ञात व्यक्ती करू शकणार नाही. तसेच, तुम्ही तुमचे जुने आधार कार्ड मास्क्ड आधार कार्डमध्ये रूपांतरित करू शकता. हे काम ऑनलाईन सहज करता येते. याचबरोबर, eaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाइटवर लॉगइन करुन तुम्ही नियमित आणि मास्क्ड आधार कार्ड डाऊनलोड करु शकता.

आधार कार्ड डाऊनलोड कसे कराल?

  • सर्वात आधी eaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाइटवर जा.
  • वेबसाइटवर गेल्यानंतर आपला 12 अंकी आधार क्रमांक टाका.
  • तुम्हाला मास्क्ड आधार कार्ड हवे असल्यास तसा ऑप्शन निवडावा.
  • स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाईप करावा.
  • त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी स्क्रीनवर टाकून सबमिट करावा.
  • ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर आधार कार्डाचा तपशील आणि डाऊनलोड करण्याचे पर्याय दिसतील.

कशी कराल आधार कार्डाची पडताळणी?

  • सर्वप्रथम uidai.gov.in/verify या थेट लिंकवर लॉग इन करा.
  • पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला समोर टेक्स्ट बॉक्स दिसेल. त्यामध्ये तुमचा १२ अंकी आधार क्रमांक टाका.
  • त्यानंतर कॅप्चा कोड टाका.
  • यानंतर व्हेरिफाय ऑप्शनवर क्लिक करा.
  • तुमचा आधार क्रमांक योग्य असल्याचा एक मेसेज पेजवर डिस्प्ले होईल. त्यामध्ये नमूद केलेल्या आधार क्रमांकाची पडताळणी करुन घ्या.
  • तुमचा खासगी तपशीलही या पेजवर दिसेल. 
टॅग्स :Adhar Cardआधार कार्डIndiaभारत