जवळपास एक वर्षाने रिलायन्सने बहुप्रतिक्षित जिओफायबर सेवेची घोषणा केली आहे. ही सेवा जरी 5 सप्टेंबरपासून सुरू होणार असली तरीही ग्राहकांमध्ये इंटरनेट स्पीड, दर आदीबाबत उत्सुकता आहे. 700 रुपयांपासून सुरू होणाऱ्या या सेवेमध्ये काय काय मिळणार हे 5 सप्टेंबरलाच समजणार असले तरीही आम्ही काही माहिती घेऊन आलो आहोत.
जिओफायबरची किंमत : जिओफायबरचे दर 700 रुपयांपासून सुरू होणार आहेत. 10 हजार रुपयांपर्यंत हे प्लॅन आहेत. यामध्ये वार्षिक पॅकेजची माहिती देण्यात आलेली नाही.
जिओफायबरचा वेग : जिओफायबरच्या ग्राहकांना कमीतकमी 100Mbps चा वेग मिळणार आहे. तर टॉप स्पीड 1Gbps असेल. जिओफायबर सेट टॉप बॉक्स : वाय फाय राऊटरसोबत जिओच्या ग्राहकांना मोफत सेटटॉप बॉक्स मिळणार आहे. शिवाय 4 के टीव्हीही मिळणार आहे. सेटटॉप बॉक्समध्ये व्हिडिओ कॉलिंगसारखे फिचरही मिळेल.