मुंबई - आपल्या युजर्ससाठी नेहमी नवनवे फिचर्स आणणा-या लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने नव्या वर्षात गुपचूपपणे नवे फिचर जोडलं आहे. फक्त अँड्रॉईडच्या बिटा फोनसाठी अपडेट आणलं आहे. या नव्या अपडेटनुसार वॉईस कॉल आणि व्हिडीओ स्विच करण्यात येणार आहे. या नव्या फीचरमुळे कॉल सुरु असताना वॉईस कॉल की व्हिडिओ कॉल असा पर्याय उपलब्ध होणार आहे. गेल्या महिन्यात व्हॉट्सअॅपकडून या नव्या फीचरची चाचपणी सुरु होती. सध्या फक्त बिटा 2.18.4 वर्जनसाठी ही सुविधा सुरु आहे. WABetaInfo ने याबाबतची माहिती दिली आहे. कंपनी कॉल स्विचच्या फिचरला यूजर्ससाठी आधिक सोप करत आहे, त्यासाठी त्यांनी क्विक स्विच बटन स्क्रिनवर उपलब्ध करुन दिलं आहे. ते क्लिक कताचाच व्हिडीओ आणि व्हाईस कॉल स्विच करता येईल.
असे करणार काम - जर तुम्ही एखाद्या व्यक्तीशी व्हिडीओ क्लॉलवर बोलत असाल आणि तुम्हाला व्हाईस कॉलवर बोलायचं असल्यास तुमच्या स्क्रिनवर असलेलं क्विक बटनला क्लिक करा. त्यानंतर तुमची रिक्वेस्ट समोरच्याकडे जाईल. त्यानी ती स्वीकारल्यास तुमचा कॉल स्विच होईल.
तरच व्हिडिओ कॉल कॉल उचलल्यास व्हॉइस कॉल हा अचानक व्हिडिओ कॉलमध्ये स्विच करणार नाही. समोरच्या व्यक्तीला यासंबंधी गेलेली रिक्वेस्ट एक्सेप्ट झाल्यानंतरच व्हिडिओ कॉल सुरू होऊ शकेल.
रेकॉर्ड व्हॉईस कॉल व्हॉईस मेसेजसाठी व्हॉट्सअॅप एक नवे फिचर आणत आहे. फोन कॉल सुरु असताना किंवा संपल्यावर एक ऑप्शन युजरसमोर येईल. कॉल वर बोलायचे किंवा कॉल रेकॉर्ड करायचा याची निवड यातून युजरला करता येणार आहे. त्यामूळे रेकॉर्ड झालेला वॉईस कॉल नंतरही ऐकता येणार आहे.
व्हॉट्सअॅपवर नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा खच, भारतातून तब्बल २ अब्ज संदेशांची देवाणघेवाण
ववर्षाच्या शुभेच्छा देताना रात्री बरोबर १२ वाजता व्हॉट्सअॅप तब्बल २ तास बंद पडलं होतं. त्यानंतर अनेकांनी व्हॉट्सअॅप बंद पडल्याच्या तक्रारी ट्विटरद्वारे द्यायला सुरुवात केली होती. २ तासांनी व्हॉट्सअॅप सुरू झालं तेव्हा कित्येकजण झोपी गेले होते. पण आता अशी माहिती समोर येतेय की, नवीन वर्षात शुभेच्छा देण्यासाठी तब्बल २० अब्ज संदेश भारतीयांकडून पाठविण्यात आले आहेत. व्हॉट्सअॅपनेच याविषयी अधिकृत माहिती दिलीय. आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी आकडेवारी असल्याचंही सांगण्यात येत आहे. व्हॉट्सअॅप खरंतर आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं अॅप आहे. आजवर मॅसेजिंगचे असंख्य अॅप आले. मात्र तरीही व्हॉट्सअॅपची जागा कोणत्याच अॅपने घेतली नाही. रोज असंख्य मॅसेज या व्हॉट्सअॅपद्वारे केले जातात. आजवर जगभरात जवळपास २ बिलिअन युजर्स व्हॉट्सअॅपला लाभले आहेत.
WhatsApp वर डिलीट केलेले मेसेज पुन्हा वाचता येतात!
नोटिफिकेशन हिस्ट्री (Notification History) नावाचे एक अॅप आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करावे लागेल. डाऊनलोड केल्यानंतर हे अॅप इंस्टॉल करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येईल. ज्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन कंटेंटमध्ये वाचता येतील. तुम्हाला पाठवलेला मेसेज डिलीट करण्यात आला असेल तरीही तो वाचला जाऊ शकेल. याशिवाय कोणत्याही अतिरिक्त अॅप ऐवजी नोटिफिशेकचा वापर करु शकतो. तसेच, फोनच्या होमस्क्रीन बटनवर जास्तवेळ प्रेस केल्यानंतर Widgets > Activities > Settings > Notification log येऊ शकते. मात्र, फोन एकदा रिस्टार्ट केला असेल तर मेसेज वाचता येणार नाहीत. जास्तीत जास्त 100 अक्षरे वाचता येऊ शकतील.